तुम्ही सततच्या डोकेदुखीने त्रस्त आहात ? हे पदार्थ आणि घरगुती उपाय करून पहा, फक्त 5 मिनिटांमध्ये डोकेदुखी पासून मिळेल आराम !

तुम्ही सततच्या डोकेदुखीने त्रस्त आहात ? हे पदार्थ आणि घरगुती उपाय करून पहा, फक्त 5 मिनिटांमध्ये डोकेदुखी पासून मिळेल आराम !

डोकेदुखी ही एक सामान्य आरोग्याची स्थिती आहे जी नियमितपणे बर्‍याच लोकांना त्रास देत असते. डोकेदुखी टाळण्याचा कोणताही मार्ग नाही कारण ही कोणतीही किरकोळ घटनेमुळे उद्भवू शकते आणि आपण काही वेळा डोकेदुखीकडे जास्त लक्षही देत नाही.

पुरेशी झोप, सकाळचा नाश्ता, कामाचा दबाव किंवा तणावग्रस्त दिवसांमुळे डोकेदुखी होऊ शकते आणि आपले आयुष्य उलटपालट होऊ शकते. सर्वसाधारणपणे, अशा परिस्थितीत आपण काय करता? मेडिकल शॉपमधून औषध घेतो आणि ते खातो, आणि असे आपण बऱ्याचवेळा करतो. बर्‍याच पेनकिलर दीर्घकाळापर्यंत आपल्या आरोग्यास हानिकारक ठरू शकतात.

आपल्याला डोकेदुखीपासून मुक्त होण्याचा आणखी एक सुरक्षित आणि प्रभावी मार्ग म्हणजे डोकेदुखी कमी करणारे पदार्थ खाणे. होय, काही पदार्थ डोकेदुखी दूर करण्यासाठी ओळखले जातात. चला तर ते पदार्थ कोणते आहेत ते जाणून घेऊयात…

आलेयुक्त चहा – आलेयुक्त चहा हा स्वादालाही चांगला लागतो आणि डोकेदुखीत आराम देतो. आलेयुक्त चहामुळे शरीरामधील रक्तवाहिन्यांतील सूज कमी करण्यास मदत होऊन वेदना कमी होते. त्यामुळे दररोज आलेयुक्त चहा पिण्याची सवय लावा. त्यानं सामान्य आरोग्यही चांगलं राहातं.

पाणी प्या – शरीरातील पाणी कमी झाल्यानं म्हणजे डिहायड्रेशनमुळे बरेचदा डोकेदुखी होते. अशाप्रकारची डोकेदुखी अनेकांसाठी सामान्य बाब आहे मात्र नक्की डोकं का दुखतंय हे अनेकांना कळत नाही. त्यामुळे यापुढे कधी अचानक डोके दुखायला लागल्यास भरपूर पाणी प्या. कारण भरपूर पाणी प्यायल्याने सुद्दा डोकेदुखीवर मात करता येते.

स्ट्रेच करून पहा – अनेकदा नसांच्या किंवा स्नायूंच्या ताणामुळे डोकेदुखी होते. अनेकदा पाठीचा वरचा भाग, मान, खांद्यावर ताण पडल्यास डोकं दुखतं. त्यामुळेच साधेपणानं मानेचं स्ट्रेचिंग केल्यानं डोकेदुखीवर आराम मिळतो. मान डावीकडे-उजवीकडे, वर-खाली सावकाशपणे फिरवल्यास शरिरातील अनेक स्नायूंची हलचाल होऊन ते थोडे मोकळे होतात. मात्र अशाप्रकारे स्ट्रेचिंग करुन व्यायाम करताना मानेला लचका बसणार नाही याची काळजी घ्यावी.

गरम लवंग – डोकेदुखी घालवण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे लवंग. तव्यावर काही लवंगा शेकून घ्या. त्यानंतर गरम असतानाच या लवंग रुमालात बांधून घ्या. त्यानंतर या रुमालातून येणारा गरम लवंगांचाचा वास घेत राहा. यामुळे डोकेदुखीचा त्रास नक्कीच कमी होईल.

अॅक्युप्रेशर करा – अॅक्युप्रेशर हा अनेक आजारांवरील उपाय आहे. अंगठा आणि तर्जनी म्हणजे पहिल्या बोटाच्या मधल्या भागात असलेल्या स्थायूंवर एक मिनिटापर्यंत दाब द्या. अशाप्रकारे स्नायूवर योग्य प्रमाणात दाब दिल्यामुळे डोकेदुखीपासून सुटका होईल.

लिंबू पाणी – शरीरातील आम्लांचं प्रमाण कमी अधीक झाल्यास डोकेदुखी होते. अशाप्रकारची डोकेदुखी असल्यास लिंबूपाण्यात थोडं मीठ किंवा खाण्याचा सोडा घालून ते प्यावं. लिंबू पाण्यामुळे शरीरातील आम्लांच (अॅसीडचं) प्रमाण संतुलित होतं.

बर्फाचा शेक – अनेकदा डोक्यामधील नसांना सूज असल्यामुळेही डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे कपाळ आणि कानाच्या जवळच्या भागावर बर्फाचा शेक दिल्यास फायद्याचे ठरते. एकंदरीत कोणता ऋतू आहे आणि वातावरणाचा अंदाज घेऊन शेक घ्यायचा की नाही, हे ठरवावे.

टरबूज खा – डोकेदुखी असताना पाणीदार फळे खाणे फायद्याचे ठरते. त्यामुळेच टरबुजसारखं पाणीदार फळ खाल्यास वर नमूद केल्याप्रमाणे डिहायड्रेशनपासून होणाऱ्या डोकेदुखीपासून मुक्तता मिळते. त्यामुळे टरबुज किंवा अन्य पाणीदार फळांचा आपल्या आहारात नियमित समावेश असल्यास ते आरोग्यासाठी फायद्याचे असते.

दीर्घ श्वास घ्या आणि सोडा – ऑक्सिजनची कमतरता हेही डोकेदुखीचे एक कारण असू शकते. त्यामुळे डोके दुखत असल्यास जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळेल अशा भरपूर झाडं असलेल्या भागात एखादा फेरफटका मारावा. हा फेरफटका मारताना मोठ्याने श्वास घ्यावा आणि सोडावा. डोकेदुखी नक्कीच कमी होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप– या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral