डोळ्याखालचे वर्तुळे घालायचेत का, फक्त हे 5 घरगुती उपाय करा आणि वर्तुळाना दूर करा

डोळ्याखालचे वर्तुळे घालायचेत का, फक्त हे 5 घरगुती उपाय करा आणि वर्तुळाना दूर करा

आजकालच्या जमान्यात मध्ये अनेकांना बारा-बारा तास काम करावे लागते. तसेच अनेकांना कॉम्प्युटर समोर बसून काम करावे लागते. तसेच इतर मानसिक तणावामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यातल्या त्यात डोळ्याखाली वर्तुळे येणे ही समस्या अनेकांमध्ये पाहायला मिळते. खासकरून महिलांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात आहे. ज्या महिला बाहेर नोकरी करतात, त्यांच्या बाबतीत ही समस्या मोठी निर्माण झालेली आहे. तसेच यावर त्या अनेकदा उपचार करतात.

मात्र, त्याने काहीही फरक पडत नाही. डॉक्टर महागडी औषधे लिहून देतात. मात्र, काही काळासाठी फरक पडतो. नंतर त्यांना काहीही फरक पडत नाही. त्यामुळे आम्ही आपल्याला या लेखांमध्ये आज डोळ्याखालील वर्तुळे घालवण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत. हा उपाय करून आपण पहा व जेणेकरून आपल्याला नक्की फरक पडेल.

1) मसाज – डोळ्याखाली वर्तुळे निर्माण झाल्यास आपण घरगुती पद्धतीने मसाज देखील करू शकता. खोबरे आणि बदामाचे तेल एकत्र करून हे तेल आपण वर्तुळ ज्या ठिकाणी आलेल्या त्या ठिकाणी लावावे. त्यामुळे आपल्याला आराम पडताे. पण मात्र हे तेल लावताना एक तास डोळ्याखाली ठेवावे. त्यानंतर तोंड धुऊन घ्यावे. आपल्याला नक्की फरक पडेल.

2) लेप – आपण अनेकदा चेहऱ्यावर लेप लावलेला असेल. डोळ्याखाली वर्तुळे आलेले असतील तर वेगळ्या पद्धतीने लेप लावावा. खोबरे बारीक करून घेऊन लिंबाचा रस, चिनीमाती ते तीन चमचे असे मिश्रण करावे आणि अर्धा तास भिजत ठेवावे. त्यानंतर ते वर्तुळ ज्या ठिकाणी आले त्या ठिकाणी नावे एक तासानंतर चेहरा धुऊन घ्यावा. आपण आठवड्यातून असे तीन वेळेस करावे. यामुळे आपल्याला नक्की फरक पडेल.

3) टोमॅटो – आपल्याला घरामध्ये टोमॅटो हे सहज उपलब्ध होतात. त्यामध्ये लिंबाचा रस मिसळावा. एकत्रित मिश्रण करावे आणि हे मिश्रण ज्या ठिकाणी वर्तुळ आलेले आहेत, त्या ठिकाणी लावावे ,असे काही दिवस केल्यानंतर आपल्याला ही समस्या दूर होऊ शकते. मात्र, चेहरा धुण्यासाठी नारळाचे पाणी वापरावे. यामुळे आपल्याला फरक पडू शकतो.

4) बटाटा – बटाट्याचा वापर आपण अनेकदा करतोच. बटाटे हे सगळ्यांच्या घरात सहज उपलब्ध असतात. बटाट्याचा कीस करून किंवा बटाटे वर्तुळाकार करून डोळ्यावर ठेवावेत, असे काही दिवस करावे. यामुळे आपल्याला वर्तुळे जिथे आहेत ती समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते.

5) काकडी – काकडी ही आपण अनेकदा खातो. काकडी मध्ये अनेक औषधी गुणधर्म भरलेले असतात. आपल्याला वर्तुळाची समस्या असेल, तर आपण काकडी चिरुन घ्यावी आणि डोळ्यावर ठेवावी. यामुळे आपल्याला डोळ्याखालील वर्तुळे झालेले आहेत. ते काही प्रमाणात कमी होण्यास नक्कीच मदत मिळते. आम्ही आपल्याला हे उपाय सांगत आहोत. मात्र, आपण डॉक्टरांचा सल्ला देखील घेऊ शकता.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral