‘निवेदिता सराफ’ यांच्यासोबत रात्री घरी येतांना घडली ‘वाईट’ घटना, मागून तो आला…

‘निवेदिता सराफ’ यांच्यासोबत रात्री घरी येतांना घडली ‘वाईट’ घटना, मागून तो आला…

अग बाई सासुबाई या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे निवेदिता सराफ. निवेदिता सराफ आसावरीच्या भूमिकेत आपल्याला या मालिकेत दिसल्या. निवेदिता सराफ यांच्या सोबत नुकतीच एक वाईट घटना घडली.

मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील लोकप्रिय असलेल्या निवेदिता नुकत्याच आपल्याला अग बाई सासुबाई आणि आता आपल्याला भाग्य दिले तू मला या मालिकेत आपणा सर्वांना दिसत आहे. निवेदिता सराफ यांचा दर्जेदार पाहायला मिळत आहे. निवेदिता जोशी सराफ यांच्या ड्रायव्हरला रविवारी रात्री नऊच्या जंक्शन येथे किरकोळ वादातून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.

रविवारी रात्री झालेल्या घटनेत त्यांच्या ड्रायव्हरला मारहाण करणाऱ्या व्यक्तीकडे सेडन पद्धतीची कार होती. निवेदिता सराफ यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गाडीची तपशील मागवला आहे. संबंधित व्यक्तीचा शोध लागला नसला तरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. तसेच पोलिसांनी या रस्त्याचे सीसीटीव्ही फुटेज मागवले आहे.

याबद्दल अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, मी रात्री घरी परत येत असताना साडेदहाच्या सुमारास सिग्नल लागल्यावर रस्त्यावर आम्ही थांबलो असता मागून संबंधित चालकाने आम्हाला धडक दिली. मागील गाडीने धडक दिल्यानंतर माझे ड्रायव्हर अजय ठाकूर गाडीचे झालेले नुकसान पाहण्यासाठी गाडी बाहेर आले.

त्यावेळी दुसऱ्या चालकाने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर माझ्या ड्रायव्हरला मारहाण करून त्याने गाडी जवळ येऊन मला काच खाली घेण्यास सांगितले. माझ्या ड्रायव्हरने पोलिसांना बोलतो असं म्हटल्यावर भितीने तेव्हा संबंधित व्यक्ती तिथून पळ काढत असताना तिथे समोर एक बस आली.

त्यावेळी त्या बस ड्रायव्हरला शिवीगाळ करून तो पुढे निघून गेला. अशाप्रकारे शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीचा गाडी क्रमांक एम एच 12 बी डी 9945 असून त्याच्या गाडी चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली, असे निवेदिता सराफ यांनी सांगितले आहे.

Team Hou De Viral