दररोज बडीशोप घातलेलं दूध प्या, तर आरोग्याच्या तक्रारींसाठी सतत दवाखान्यात जाणं विसराल

बडीशोप मध्ये व्हिटॅमिन सी मोठया प्रमाणात आढळते. बडीशोपमध्ये कॅल्शियम, सोडियम, फॉस्फरस, लोह आणि पोटॅशियम यासारखे विविध प्रकारचे खनिजे देखील असतात. हे सर्व घटक शरीराच्या कार्यप्रणालीला योग्य प्रकारे कार्य करण्यास मदत करतात. यामुळे आपण दुधामध्ये बडीशोप उकळून प्या. रात्री झोपायच्या आधी या दुधाचे सेवन केल्याने आपल्याला दूध आणि बडीशोपच्या पोषक आहारांचा पुरेपूर फायदा मिळतो. चला तर मंग जाणून घेऊया बडीशोप खाण्याचे काही आरोग्यविषयक फायदे.
श्वसनासंबंधित समस्यांपासून मुक्तता – आजकाल कोरोना विषाणूच्या साथीच्या पहिल्या लक्षणांमधे श्वसन प्रणालीशी संबंधित समस्या आहेत. घसा दुखणे, श्वास घेण्यास त्रास आणि दमा यासारख्या आजारांवर बडीशोप दूध खूप फायदेशीर आहे. म्हणूनच दररोज रात्री झोपायच्या आधी बडीशोपचे दूध प्या. यामुळे दम्याची लक्षणे हळूहळू कमी होतात.
रोगप्रतिकार शक्ती वाढते – दुधात बडीशेप मिसळून पिल्यास रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. वास्तविक, बडीशेप मध्ये अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, जे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कार्य करतात. दुधातील प्रथिने आणि बडीशेपमधील पोषक शरीरात पोषण प्रदान करते आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवते.
मासिक पाळीच्या वेदना कमी – मुलींना पाळी मध्ये बर्याच वेदनातून जावे लागते. या प्रकरणात, बडीशेप दुधात मिसळल्याने मासिक पाळी संबंधित त्रासांपासून मुक्तता मिळते. यासाठी एका ग्लास दुधात एक चमचा बडीशेप घाला. ते चांगले उकळून प्यावे.
खोकल्याची समस्या दूर होते – खोकला झाल्यास जर तुम्ही बडीशेप खाल्ली तर तुम्हाला लगेच फरक जाणवेल. खोकल्यावर बडीशेप मधात किंवा दूधात मिक्स करून दिवसातून दोन ते तीन वेळा खाल्ल्यास खोकल्यात फरक जाणवेल. बडीशोप आणि खडीसाखर रोज खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधीही दूर होते.
कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं – तुम्हाला कॉलेस्ट्रॉलची लेव्हल मर्यादेत ठेवायची असेल तर जेवणाआधी जवळजवळ ३० मिनिटं एक चमचा बडीशेप खावी. बडीशेप कॉलेस्ट्रॉल लेव्हल आटोक्यात ठेवते. सकाळी उठल्यानंतर दुधासोबत बडीशोपचं सेवन करणंही कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी फायद्याचं ठरू शकतं.
कसे बनवावे बडीशेपचे दूध – एक ग्लास दूधामध्ये अर्धा चमचा बडीशोप मिसळून दूध उकळा. हे गाळणीने गाळून प्यावे. यामुळे बडीशेपचा अर्क दूधामध्ये उतरेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.