दररोज दुधात हळद टाकून प्या आणि ‘या’ आजारांना झटक्यात पळवून लावा

पूर्वीच्या काळी राजे-महाराजे हे कुठल्याही औषधी गोळ्या घेऊन आपली ताकत वाढवत नव्हते. त्यांचा आहार हा अतिशय सक्षम असायचा. म्हणजे भारतीय आहारामध्ये असे अनेक पदार्थ आहे की, जे सकस आहार वाढू शकतात. असे अनेक पदार्थ आहे की, ज्याने तुमची ताकद खूप वाढू शकते .दुधामध्ये कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असते. पूर्वीचे लोक दूध घेऊन आपली ताकद मोठ्या प्रमाणात वाढवत असे.
मात्र, आजच्या जमान्यामध्ये जंकफूड खाऊन लोक आपले आरोग्य बिघडत आहेत. मात्र दूधासह आरोग्यदायी वस्तू ते खात नाहीत. आम्ही आपल्याला आज या लेखांमध्ये दूध आणि हळद एकत्र मिश्रण करून पिण्याचे फायदे सांगणार आहोत.
दूधामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते आणि अनेक पोषक तत्वे असतात. तसेच हळद ही भारतीय आहारामध्ये वापरली जाणारी एक वस्तू आहे. हळदीचा वापर भाजी बनवण्यासाठी वरण करण्यासाठी भाताला फोडणी देण्ण्यासाठी करण्यात येतो. तसेच हळद ही देव पूजेसाठी देखील वापरली जाते .हळदीमध्ये मोठे औषधी गुण असतात. हळद ही अँटिबायोटिक असते आणि अनेक आजारावर तिला मागणी आहे. तर मग हळद व दुधाचे उपयोग जाणून घेऊया…
1) जखम – अनेकदा आपल्याला छोटे मोठे काम करत असताना जखम होत असते.अशा वेळेस घरात क्रीम किंवा औषधी उपलब्ध नसतात. अशा वेळी आपण घरगुती उपाय करून यावर मात करू शकतो. हळदीमध्ये मोठे औषधी गुणधर्म आहेत. हळदी अँटिबायोटिक असते. त्यामुळे ज्या ठिकाणी जखम झाली आहे त्या ठिकाणी हळद लावावी तुमची जखम ही ताबडतोब भरून निघते.
2) शारीरिक ऊर्जा – आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात थकवा जाणवत असेल. तर आपण आठवड्यातून किमान चार दिवस तरी हळद आणि दूध यांचे मिश्रण करून हे दूध प्राशन केले पाहिजे. यामुळे आपल्याला चांगली ऊर्जा निर्माण होऊ शकते आणि आपल्याला थकायला होत नाही. त्यामुळे कुठल्याही ड्रिंक्स पेक्षा हे ड्रिंक अतिशय उत्तम समजावे.
3) सुंदर त्वचा – अनेक जण आपली त्वचा सुंदर करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेत असतात. त्यातल्या त्यात महिला या डॉक्टरांकडे जाऊन ब्युटीपार्लरमध्ये जाऊन आपल्या त्वचा कोमल करण्याच्या मागे लागलेल्या असतात. मात्र त्यांनी घरगुती उपाय केला तर यावर फरक पडू शकतो. हळद आणि दूध एकत्र घेतल्यास या यावर फरक पडू शकतो. असे मिश्रण पिल्याने आपली त्वचा ही अतिशय सुंदर दिसते.
4) हाडे मजबूत – अनेक जण सध्या बाहेरचे खाणे खूप मोठ्या प्रमाणात करतात. तसेच जंक फूड खाल्ल्याने तुमच्या शरीराची मोठ्या प्रमाणात झीज होते . त्यामुळे सकस आहार घेणे हे कधीही चांगले. दूध आणि हळद एकत्र घेतल्याने तुमचे हाडे हाडे ठिसूळ होत नाही. तसेच तुमच्या मध्ये मोठी ऊर्जा निर्माण होते. दुधामध्ये कॅल्शियम असल्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते . तसेच हळदीमध्ये मोठे औषधी गुण आहेत. याचे मिश्रण घेतल्याने त्याने तुमचे हाडे मजबूत होतात.
5) सर्दी – आजकाल अनेक लहान मुले व मोठ्या माणसांनादेखील सर्दीचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. तरी जर आपण सरळ डॉक्टर कडे जातो. डॉक्टर महागडी औषधे लिहून देतात तर त्यांनी तीन दिवस काही फरक पडत नाही. जर आपल्याला सर्दी असल्यास आपण घरगुती उपाय करू शकता. दूध आणि हळद एकत्र करून तीन दिवस घ्यावे यामुळे तुमच्या सर्दीला आराम पडतो.
6) झोप न येणे – आजकाल अनेकांना झोप न येण्याची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. झोपेच्या गोळ्या खाऊन झोपायचा प्रयत्न करतात. मात्र, असे केल्याने त्याच्या शरीरावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे आयुर्वेदिक उपाय केल्यास करावे. आपण दूध आणि हळद याचे एकत्र मिश्रण घ्यावे आणि त्यानंतर फरक पहावा. आपल्याला शांत झोप लागेल.
7) पचन – पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकांना अन्नपचन होण्याची मोठी समस्या असते. त्यामुळे अनेक जण औषधी उपचार घेतात. मात्र, तरीही त्यांना काही फरक पडत नाही. मात्र यावर आपण घरगुती उपाय करून यावर मात करू शकतात. जर आपण आणि हळद व दुधाचे मिश्रण एकत्र करून घेतले तर आपली पचनक्रिया ही चांगली सुधारणे आणि आपण यावर मात करू शकता.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.