चुकूनही हे पदार्थ कधीच एकत्रित खाऊ नका, नाहीतर व्हायला लागेल दवाखान्यात भरती, जाणून घ्या त्या पदार्थाबद्दल

चुकूनही हे पदार्थ कधीच एकत्रित खाऊ नका, नाहीतर व्हायला लागेल दवाखान्यात भरती, जाणून घ्या त्या पदार्थाबद्दल

भारतीय आयुर्वेदामध्ये आहार-विहार विषयी वेगवेगळे महत्व विशद केले आहे. काय खावे, काय खाऊ नये, कशा सोबत काय खाऊ नये. याबाबत वेगळी माहिती दिलेली आहे. आपण कुठल्या पदार्थाचे सेवन करावे किंवा करू नये. किंवा कुठल्या पदार्थांचे सेवन कुठल्या गोष्टी सोबत करावे. याची माहिती देखील दिलेली आहे. तसेच एखाद्या पदार्थाने काही अपाय होऊ शकतात का, याबाबत देखील माहिती दिलेली आहे.

याप्रमाणे आपण आपले दैनंदिन जीवन सुरू ठेवले तर आपल्याला आजाराचा सामना करावा लागू शकत नाही. त्यामुळे आयुर्वेदानुसार आपण आहाराचे नियमितपणे सेवन करावे. त्यामुळे आपल्याला पोट दुखी आणि त्या समस्या होत नाहीत. आज आम्ही आपल्या लेखांमध्ये याबाबत माहिती सांगणार आहोत. कुठले पदार्थ कुठल्या पदार्थ सोबत खाऊ नये. चला तर मग जाणून घेऊया..

1) दूध : हे मानवी जीवनासाठी अतिशय आवश्यक आहे. दुधामध्ये मध्ये प्रोटीन कॅल्शिअम आणि इतर पोषक तत्वे असतात. मात्र, आपण दुधासोबत इतर गोष्टीचे सेवन केले तर ते आपल्याला अपायकारक ठरू शकते. यामुळे आपली पचनक्रिया देखील खराब होऊ शकते.

दूधसोबत आपण कधीही उडीद डाळ, पनीर, अंडा, मटन, हिरव्या भाज्या खाऊ नये असे केल्याने आपली पचनक्रिया ही बिघडत असते. या पदार्थाच सेवन अजिबात दुधासोबत करता कामा नये. नाहीतर आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागू शकतो किंवा आपले पोट बिघडू शकते. त्यामुळे हे पदार्थ दुधासोबत खाने कधीही टाळा.

2) दही : अनेकांना दही खूप आवडत असते. तर दह्यासोबत काही पदार्थांचे जर आपण सेवन केले तर आपल्याला याचा फटका बसू शकतो. त्यामुळे दह्यासोबत हे पदार्थ आपण कधीही खाऊ नये. यामुळे आपल्याला अपाय होऊ शकतो. या सोबत आंबट फळ कधीही खाऊ नये. यामध्ये एन झिम मोठ्या प्रमाणात असते. यामुळे आपण दह्यासोबत याचे सेवन केल्यास आपली पचनक्रिया बिघडू शकते.

3) मासोळी : मासोळी खाणे अनेकांना आवडत असते. मासोळी मध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. विटामिन, कॅल्शियम प्रोटीन मोठ्या प्रमाणात मासळीमध्ये भेटत असते. त्यामुळे मासोळी खाणे हे कधीही चांगले. मासोळी ही गरम असते. या सोबत आपण दही खाल्ले तर आपले पोट दुखू शकते. दही हे थंड असते. त्यामुळे दोन्ही मिश्रण सोबत कधीही खाऊ नये. यामुळे आपल्याला त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

4) मध : मध हे नैसर्गिक स्त्रोत असलेला पदार्थ आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे भरलेले असतात. मात्र, मध सोबत आपण तेल, पाणी कधीही घेऊ नये. असे केल्याने आपले पोट हे बिघडू शकते.

5) थंड पाणी : थंड पाणी पिणे अनेकांना आवडत असते. मात्र, थंड पाणी पिल्याने आपल्याला घातक आजार होऊ शकतात. त्यामुळे थंड पाणी पिणे नेहमी टाळावे. पाण्यासोबत आपण तूप, तेल, खरबूज, पेरु काकडी हे कधीही खाऊ नये. यामुळे आपल्याला त्रासाला सामोरे जावे लागू शकते. खीरीसोबत आपण सातूचे पीठ अजिबात खाऊ नये, या यामुळे त्रास होऊ शकतो.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral