‘अंत्यसंस्कार’ पूर्वी मृतदेहाला नवीन कपड्यामध्ये का गुंडाळतात? जाणून घ्या त्यामागचे धार्मिक कारण

‘अंत्यसंस्कार’ पूर्वी मृतदेहाला नवीन कपड्यामध्ये का गुंडाळतात? जाणून घ्या त्यामागचे धार्मिक कारण

मानवी जीवनामध्ये कपड्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मात्र, जिवंतपणी आपण जे कपडे घालतो तेच मृत्यूपश्चात घालण्यात येत नाहीत. याला देखील धार्मिक कारण हे आहे. आपण जिवंतपणी रंगबिरंगी कपडे घालतो. मात्र, मृत्यूनंतर केवळ पांढरे कपडे हे घालण्यात येतात, असे का करण्यात येते. याबाबत अनेकांना ही माहिती नसते.

आज आम्ही आपल्याला याबाबतची माहिती देणार आहोत. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याला चितेवर ठेवण्याआधी पांढऱ्या शुभ्र वस्त्रांमध्ये ठेवण्यात येते. गरुड पुराणामध्ये अंत्यसंस्कार बाबत माहिती देण्यात आलेली आहे. यामध्ये अतिशय विस्तृत माहिती देतांना सर्व संस्कार बाबतही माहिती देण्यात आली आहे.

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांनी केस काढावे, असे देखील यात नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास स्मशानभूमीत गेल्यावर परत येताना मागे वळून पाहून नाही हे देखील धार्मिक कारण यामध्ये देण्यात आले आहे.

कारण असे केल्यास मृतात्मा तुमच्या आजूबाजूला परत येऊ शकतो आणि त्याला असे वाटू शकते की, माझ्या लोकांचा अजूनही माझ्या मध्ये जीव आहे आणि मी आता हे शरीर सोडले तरी यांच्या आजूबाजूला येऊन राहतो, असे त्याला वाटू शकते. त्यामुळे मागे वळून पाहू नये, असा त्याचा अर्थ होतो.

गरुडपुराणामध्ये मृतदेहाला अग्नी डाग देण्यापूर्वी करण्याचा विधी विस्तृतपणे सांगितलेला आहे. या मध्येच नवीन कपडे घालण्याबाबत उल्लेख केलेला आहे. एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला असेल तर त्याला सुरुवातीला आंघोळ घातली जाते. धार्मिक मान्यतेनुसार मृतदेहाला तीर्थस्थळी नेऊन अंत्यसंस्कार करण्यात येतात.

मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये हे शक्य होत नाही. त्यामुळे गंगेचे पाणी आपल्या साध्या पाहण्यांमध्ये आणून ते मिसळून मृतदेहाला स्वच्छ आंघोळ घालण्यात येते. त्याचप्रमाणे असे करत असताना गुरुदेव दत्त नावाचा जप देखील करावा, असेही सांगण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे शरीराची शुद्धी या माध्यमातून होते.

त्यामध्ये काहीही दोष राहत नाही. त्याचप्रमाणे जो व्यक्ती आंघोळ घालतो, त्यालाही काही दोष लागत लागत नाही, अशी धार्मिक मान्यता आहेत. जे हात आंघोळीसाठी सरसावलेले आहेत, ते देखील संक्रमित होत नाहीत आणि असे केल्याने शरीरात जो वायू असतो तो निघून जातो. मृतदेहाला शांती मिळत असते.

यात आपले निसर्गामध्ये रजतन म्हणजेच सत्त्वगुण, रजोगुण, तमोगुण यातूनच आपले शरीर बनलेले आहे. आता आंघोळ घातल्यानंतर शरीराला आनंत सिद्धी प्राप्त होते. त्याचप्रमाणे पांढरे वस्त्र शरीराला घालावे आणि ती वस्तू घातल्यानंतर चितेवर घेऊन मृतदेह ठेवावा. त्याला तूप, तीळ, चंदनाचा लेप देखील लावावा, असे देखील गरुड पुराणामध्ये सांगण्यात आलेले आहे.

एखाद्या मृतदेहाला नग्न कधीही जाळू नाही, हे फार अभद्र मानले गेले आहेत. त्याला झाकूनच अंत्यसंस्कार केले पाहिजेत, असे सांगण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे पांढरे कपडे घालताना त्यामध्ये गोमूत्र आणि इतर साहित्य शिंपडले पाहिजे. जेणेकरून शरीराला सुरक्षा मिळते आणि वाईट शक्तींपासून धोका पोहोचत नाही, असे देखील यामध्ये म्हटले आहे.

याचप्रमाणे पांढरे वस्त्र घातले तर शरीराला मोक्ष प्राप्त होऊ शकतो, असेही म्हटले आहे. पांढरा रंग हा शांतीचे प्रतीक आहे. त्यामुळेच मृत देहाला पांढरे वस्त्र घालण्यात येतात.

Team Hou De Viral