कलाविश्वातून वाईट बातमी ! आता या दिग्गज गायिकाचे झाले निधन

कलाविश्वातून वाईट बातमी ! आता या दिग्गज गायिकाचे झाले निधन

गेल्या काही दिवसापासून मनोरंजन विश्वाला अनेक धक्के बसत आहेत. अनेक कलाकार हे आपल्याला सोडून जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अलीकडेच प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली. विक्रम गोखले यांनी वयाच्या 77 वर्षी अखेरचा श्वास घेतला.

विक्रम गोखले हे रुग्णालयात असल्यापासून त्यांच्या मृत्यूच्या अफवा देणाऱ्या बातम्या अनेकदा समोर आल्या. अनेक प्रसिद्ध मीडिया हाऊसने देखील याबाबत बातम्या दिल्या. मात्र, त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची टेहाळणी काही कमी झाली नाही. अनेकांनी त्यांच्या मृत्यूवर अतिशय आक्षेपहार्य कमेंट केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

विक्रम गोखले यांच्या मृत्यूच्या आधी प्रसिद्ध अभिनेत्री कल्याणी जाधव हिचे देखील निधन झाले आहे. कल्याणी जाधव हिला कोल्हापूरमध्ये एका ट्रकने धडक दिली. त्यामुळे ती जागीच गतप्राण झाली. या आधी देखील अनेक कलाकार आपल्याला सोडून गेले आहेत. सुनील शेंडे हे मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते होते.

त्यांनी देखील हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक चित्रपट केले. सुनील शेंडे यांनी वास्तव सरफरोश यासारख्या चित्रपटात काम केले होते. त्यांनी देखील मुंबईतल्या घरात अखेरचा श्वास घेतला.आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे व गायकेचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. ही अभिनेत्री व गायिका भारतातील नसून पाश्चात्य देशातली आहे.

या अभिनेत्रीचे व गायकीचे नाव इरेन कारा असे आहे. इरेन कारा या गेल्या काही दिवसापासून आजारी होत्या, अशी बातमी समोर आली आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय 63 वर्ष होते. त्यांच्या मॅनेजरने त्याच्या मृत्यूच्या बातमीला पुष्टी दिली आहे. इरण कारा यांनी अनेक चित्रपटात गाणे देखील गायलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक चित्रपटात अभिनय देखील केला आहे.

आता त्यांच्या मृत्यूनंतर अवघी पाश्चात्य चित्रपट सृष्टी हळहळली असून त्यांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Team Hou De Viral