या मराठमोळ्या अभिनेत्रीने ठोकला चित्रपटसृष्टीला ‘रामराम’, समोर आले यामागचे धक्कादायक कारण

या मराठमोळ्या अभिनेत्रीने ठोकला चित्रपटसृष्टीला ‘रामराम’, समोर आले यामागचे धक्कादायक कारण

हिंदी मालिकांमध्ये गेल्या काही वर्षात मराठी कलाकारांना मागणीही मोठ्या प्रमाणात वाढल्याने आपण पाहिले असेल. श्वेता शिंदे असो नेहा पेंडसे यांनी देखील अनेक हिंदी मालिकांत काम केलेले आहे. भाभिजी घर पे है या मालिकेत या दोघींनीही काम केल्याचे आपण पाहिलेले आहे.

आतादेखील अनुपमा या मालिकेमध्ये अनघा भोसले ही मराठमोळी अभिनेत्री काम करताना दिसत आहे. मात्र, तिने ही मालिका सोडल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे आणि तिने याबाबत माहिती सांगितली आहे आणि विशेष म्हणजे तिने आता अध्यात्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला असल्याचे देखील बोलले जात आहे.

याबाबतची तिची सोशल मीडिया वरची पोस्ट सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनघा भोसले ही मराठी चित्रपट सृष्टी तसेच हिंदी मध्ये काम करणारी जबरदस्त अशी अभिनेत्री आहे. तिने हिंदी मालिकामध्ये देखील तिने काम केले आहे. अनघा हिने दीदी अम्मा दादी अम्मा मान जाओ ना, या मालिकेत छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.

त्यानंतर तिची हिंदीमधील मागणीही खूप वाढली होती. तिने सोशल मीडियावर नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. हिंदी मालिका व चित्रपट सृष्टी मध्ये कशाप्रकारे ढोंगीपणा करण्यात येतो, याबाबत तिने खुलासा करून खळबळ उडवून दिली आहे.

त्यामुळे आता तिची एकच चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षात मराठीतील अभिनेत्री देखील हिंदी मध्ये काम करताना दिसतात. नेहा पेंडसे हिनेदेखील भाभिजी घर पे है या मालिकेत काम करून धुमाकूळ करून दिला आहे. तिने देखील ही मालिका नुकतीच सोडली. त्यानंतर नेहा हिने या बाबत पोस्ट करताना सांगितले की, माझा मालिकेतील रोल संपला आणि माझा करार देखील संपला.

त्यामुळे ही मालिका मी सोडत आहे. मात्र, आता अनुपमा मालिकेत काम करणारी अनघा भोसले हिने मात्र वैतागून मालिका विश्वाला रामराम केल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत तिने एक सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अनघा म्हणते की, मराठी चित्रपटसृष्टी तशी चांगली आहे.

मात्र, हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात ढोंगीपणा असून यामुळे मला प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले आहे. अनेक पावलावर मनात दुटप्पी लोक हे भेटत होते. हे लोक अतिशय ढोंगीपणाने वागतात. तुम्ही जे काही नसतात ते देखील तुम्हाला तुम्ही असे आहात, म्हणून सांगतात. त्यामुळे तुमच्यावर दबाव देखील मोठ्या प्रमाणात टाकण्यात येतो.

हिंदी मालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. त्यामुळे तुम्हाला लोक हे तुडवत जातात. त्यामुळे आता मी मालिका विश्वाला रामराम करण्याचे ठरवले आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट केल्याने एकच चर्चा सुरू झालेली आहे. माझ्यासोबत आत्तापर्यंत जे चांगले वागले, त्यांचे आभार मानते आणि यापुढे मी या मालिकांत काम करणार नाही, असे तिने सांगितले आहे.

आपण सगळी देवाची मुले आहोत. त्यामुळे आता मी अध्यात्माच्या मार्गावर चालणार असल्याचे तिने सांगितले आहे, तर आपल्याला अनघा आवडते का ते सांगा.

Team Hou De Viral