‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील कलाकारांचे खरे कुटुंबीय…

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील कलाकारांचे खरे कुटुंबीय…

रंग माझा वेगळा ही मालिका सध्या प्रचंड गाजत आहे. या मालिकेतील सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना या खूप आवडत आहेत. या मालिकेत काम करणारे अभिनेते आणि त्यांचे कुटुंबीय नेमके काय करतात याबाबत अनेकांना माहिती जाणून घेण्याची इच्छा असते.

या मालिकेमध्ये कार्तिक, दीपा, दीपिका, कार्तिकी यांच्याबद्दल आणि त्यांच्या कुटुंबीयाबद्दल देखील अनेकांना जाणून घेण्याची इच्छा असते. आम्ही आपल्याला या लेखामध्ये त्यांच्या खर्‍या कुटुंबाबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया..

1) रेश्मा शिंदे – रंग माझा वेगळा या मालिकेमध्ये रेश्मा शिंदे हिने अतिशय जबरदस्त अशी भूमिका केली आहे. रेश्मा शिंदे हिने या मालिकेमध्ये दीपा हे पात्र साकारले आहे. रेश्मा शिंदेचे लग्न झाले असून तिच्या पतीचे नाव अभिजीत चौगुले असे आहे.

2) अनघा भगरे – या मालिकेमध्ये अनघा भगरे हिने देखील अतिशय जबरदस्त असे काम केले आहे. तिने मालिकेमध्ये श्वेताची भूमिका साकारली आहे. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती मिळत आहे. श्वेता ही अविवाहित आहे. श्वेताच्या वडिलांचे नाव अतुल भगरे असे आहे. अतुल भगरे हे मोठे वेदमूर्ती आहेत. तिच्या भावाचे नाव अखिलेश असे आहे. तर तिच्या बॉयफ्रेंडचे नाव सिद्धार्थ बोडके असे आहे.

3) आशुतोष गोखले – या मालिकेमध्ये आशुतोष गोखले यीने मुख्य भूमिका साकारली आहे. कार्तिक म्हणजेच आशुतोष गोखले हा सध्या अविवाहित आहे. त्याच्या बहिणीचे नाव श्रद्धा असे आहे, तर वडिलांचे नाव विजय गोखले असे आहे. विजय गोखले हे दिग्गज अभिनेते आहेत, तर आईचे नाव सविता गोखले असे आहे.

4) सायशा भोयर – सायशा हिने छोट्या कार्तिकीची भूमिका साकारली आहे. तिची भूमिका ही प्रेक्षकांना प्रचंड आवडते. कार्तिकीच्या वडिलांचे नाव विशांत कदम असे आहे, तर आईचे नाव पूजा कदम असे आहे.

5) स्पृहा दळवी – रंग माझा वेगळा या मालिकेमध्ये स्पृहा दळवी हिने दीपिकाची भूमिका साकारली आहे. स्पृहा हिच्या आईचे नाव वेदश्री आहे, तर वडिलांचे नाव विनय असे आहे. विनय याने मालिकेमध्ये अतिशय चांगले काम केले आहे.

रंग माझा वेगळा ही मालिका आपल्याला आवडते का आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral