चित्रपट ‘संघर्ष’ मध्ये प्रीतिच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ती मुलगी आज आहे बॉलिवूड मधली टॉपची अभिनेत्री

चित्रपट ‘संघर्ष’ मध्ये प्रीतिच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ती मुलगी आज आहे बॉलिवूड मधली टॉपची अभिनेत्री

1999 मध्ये आलेला ‘संघर्ष’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात अक्षय कुमार आणि प्रीती झिंटा मुख्य भूमिकेत होते, तर आशुतोष राणाने खलनायकाची भूमिका केली होती.

आजही हा चित्रपट लोकांच्या आठवणी आहे. परंतु या चित्रपटाशी संबंधित एक गोष्ट बर्‍याच लोकांना ठाऊक नसेल, की प्रीती झिंटाच्या बालपणीच्या भूमिकेत जी मुलगी तुम्ही या चित्रपटात पाहिली ती आजच्या काळातली अव्वलची अभिनेत्री बनली आहे. होय, त्यामुळे कदाचित आपण त्या लहान मुलीकडे जास्त लक्ष नसेल दिले. पण आज त्या मुलीने कोट्यावधी लोकांच्या हृदयात आपली जागा निर्माण केली आहे.

वास्तविक ही मुलगी इतर कोणी नसून आलिया भट्ट आहे. आणि ही आजच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्रीपैकी एक आहे. ‘संघर्ष’ हा चित्रपट बालकलाकार म्हणून आलियाचा डेब्यू फिल्म होता. जर तुम्ही ‘संघर्ष’ हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला आठवेल की या चित्रपटात प्रिती हि लहानपणी तिच्या द-हशत-वादी भावाला मर-ताना पाहते.

ज्यामुळे तिच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण होते आणि ती भीती तिला मोठं होईपर्यंत त्रास देत असती. या लहानपणीच्या सीन मध्ये आलिया भट्ट दिसली होती. त्यावेळी कदाचित त्या लहान मुलीकडे तुम्ही जास्त लक्ष नसेल, या व्हिडिओमध्ये आपण आलियाला त्या भूमिकेत पाहू शकता.

‘संघर्ष’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तनुजा चंद्र यांनी केले होते, तनुजा तेच आहेत ज्यांनी 2017 मध्ये इरफान आणि पार्वती यांच्यासमवेत ‘करीब करीब सिंगल’ हा चित्रपट बनवला होता. संघर्ष या चित्रपटात आलिया प्रीतीच्या बालपणीच्या भूमिकेत बरीच चांगली दिसत आहे, तिचा चेहरा प्रीती झिंटासारखा दिसत आहे.

‘स्टुडंट ऑफ दी इयर’ पासून लीड अभिनेत्री म्हणून करिअरची सुरुवात

संघर्ष चित्रपटानंतर आलिया करण जोहरच्या 2012 मध्ये आलेल्या स्टुडंट ऑफ दी इयर मध्ये लीड अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती. त्यात ती लोकांना खूप आवडली होते. या चित्रपटापूर्वी आलियाचे वजन खूपजास्त होते, परंतु स्टुडंट ऑफ द इयरच्या ग्लॅमरस भूमिकेसाठी आलियाने तिचे वजन कमी केले. तीन महिन्यांच्या वर्कआउट मध्ये आलियाने 16 किलो वजन कमी केले होते. मीडिया रिपोर्टनुसार, आलिया भट्टने ऑडिशन्समध्ये 400 मुलींना पछाडुन “स्टुडंट ऑफ दी इयर” या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी तिची जागा निर्माण केली.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral