21 वर्षांनंतर असा दिसतो ‘हीरा ठाकुर’ चा मुलगा, यानेच दिलेली ‘भानुप्रताप’ ला खीर, पहा आता कसा दिसतो !

21 वर्षांनंतर असा दिसतो ‘हीरा ठाकुर’ चा मुलगा, यानेच दिलेली ‘भानुप्रताप’ ला खीर, पहा आता कसा दिसतो !

बॉलिवूड चित्रपट ‘सूर्यवंशम’ चे नाव घेताच, आपल्या मनात चॅनेल सेट मॅक्सचे नाव प्रथम येईल. आणि येणार सुद्धा का नाही कारण बऱ्याचदा हा चित्रपट सेटमॅक्स वर दखावला जातो, असं वाटत आहे की हा चित्रपट नाही तर डेली सोप आहे. वास्तविक सेट मॅक्सने 100 वर्षांपर्यंत सूर्यवंशमचा हक्क विकत घेतला आहे. आता 70 ते 80 वर्षे आपल्याला हा चित्रपट अधिक दाखवला जाईल.

अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट फिल्म ‘सूर्यवंशम’ रिलीज होऊन 21 वर्षे झाली आहेत. 21 मे 1999 रोजी आलेल्या अमिताभ बच्चन आणि सौंदर्या यांच्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. ‘सूर्यवंशम’ हा टीव्हीवरील सर्वाधिक वेळा दाखवलेला चित्रपट आहे.

चित्रपटाची सर्व पात्रे प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. आयएएस बनल्यानंतरही ऑफिस मध्ये आलेल्या सासऱ्यांचे पाय पडणाऱ्या सुनेला पाहून लोकांनी तिचे खूप कौतुक केले होते, तर भानुप्रतापच्या नातवाची भूमिका साकारणारा बाल कलाकार तर लोकांच्या मनात घर करुन गेला होता.

ठाकूर भानुप्रतापांना वि-षारी खीर खाऊ घालणारा मुलगा आता कुठे आहे आणि तो काय करीत आहे हे तुम्हाला माहिती आहे काय? हा बाल अभिनेता आता मोठा झाला आहे. आनंद वर्धन असे या अभिनेत्याचे नाव आहे. आनंद हा तेलगू अभिनेता आहे आणि त्याने 20 हून अधिक दक्षिण चित्रपटांमध्ये काम केले आहे. आनंद प्रख्यात गायक पीबी श्रीनिवास यांचा नातू आहे.

आनंदने ‘प्रियारागलु’ चित्रपटातील अभिनयाने नंदी अवार्ड फॉर द बेस्ट चाईल्ड आर्टिस्ट हा पुरस्कार जिंकला. त्यावेळी तो तीन वर्षांचा होता. चित्रपटात खूप सोज्वळ दिसणारे हे मूल आज बॉलिवूडच्या मोठ्या अभिनेत्यापेक्षा काय कमी दिसत नाही.

आनंदला ‘सूर्यवंशम’ सारख्या बर्‍याच तेलगू व इतर भाषेतल्या चित्रपटात काम करायला मिळालं. आनंदने आजपर्यंत आपल्या चित्रपट कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले की तो जवळपास 12 वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.

नुकताच आनंद कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. आनंद सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह असतो आणि दररोज त्याचे फोटो पोस्ट करत राहतो. 21मे ला सूर्यवंशमच्या रिलीजला 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. अर्थात हा चित्रपट त्यावेळी एवढा काही चालला नव्हता, परंतु हा लोकप्रिय टेलिव्हिजन चित्रपटांपैकी एक आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral