उपचारासाठी पैसे नसल्यामुळे ‘या’ प्रसिद्ध कलाकाराच्या पत्नीचे निधन

उपचारासाठी पैसे नसल्यामुळे ‘या’ प्रसिद्ध कलाकाराच्या पत्नीचे निधन

बॉलीवूडमध्ये आपल्याला अनेकदा असे पाहायला मिळते की, एखाद्या कलाकाराचे महत्त्व कमी झाले की, त्याला कोणीही विचारत नाही. असे प्रकार अनेक अभिनेत्यांसोबत देखील झालेले आहेत. त्याचप्रमाणे दिग्दर्शकांसोबत देखील अनेकदा असे प्रकार झालेले आहेत.

बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेते रजा मुराद यांनी याबाबत अनेकदा खंत देखील बोलावून दाखवलेली आहे. बॉलीवूडमध्ये तुम्हाला तुमचे महत्त्व संपले की, कोणीही विचारत नाही, असे त्यांनी म्हटले आहेत. आता देखील काहीसा असाच प्रकार एका प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत घडला आहे.

या दिग्दर्शकाने 80 90 च्या काळामध्ये अनेक चित्रपट आपल्या जोरावर हिट केले होते. यामध्ये त्यांचा डिस्को डान्सर हा चित्रपट तर प्रचंड लोकप्रिय झाला होता. या चित्रपटामध्ये मिथुन चक्रवर्ती याची जबरदस्त अशी भूमिका होती. या भूमिकेमुळे मिथुन चक्रवर्ती हा रातोरात स्टार स्टार झाला होता. या चित्रपटात नंतर मिथुन चक्रवती याच्याकडे अनेक चित्रपटांचा जणू काही पाऊसच पडला.

त्यामुळे मिथुन चक्रवर्ती यांनी देखील या दिग्दर्शकांच्या अनेक आभार मानले होते. मिथुन चक्रवर्ती याच्या सोबतचा फोटो देखील या दिग्दर्शकासोबत आहे. या दिग्दर्शकाच नाव बी सुभाष असे आहे. सुभाष यांच्यावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बी सुभाष यांच्या पत्नीचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या पत्नीचे नाव तलोडमा असे होते. तर या गेल्या अनेक दिवसापासून आजारी होत्या. त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. बी सुभाष यांचे बॉलीवूडमध्ये मोठे नाव होते. बॉलीवूडमध्ये त्यांनी एकेकाळी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.

80 90 च्या दशकामध्ये त्यांनी अनेक चित्रपट हिट केले. मात्र काही वर्षानंतर ते बॉलीवूड पासून दूर फेकल्या गेले आणि त्यांना आर्थिक संकटाचा सामना देखील करावा लागला. याबाबत त्यांनी अनेकदा आपल्या चाहत्यांना माहिती देखील दिली होती, मात्र त्यांना असे असूनही मदत जास्त मिळाली नाही. याबाबत त्यांनी खंत देखील व्यक्त केली होती.

त्यांच्या पत्नीला किडनीचा विकार झाला होता. त्यामुळे त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यासमोर आर्थिक संकट देखील उभे राहिले होते. सहा वर्षांपूर्वी डॉक्टरांनी बी सुभाष यांना त्यांच्या पत्नीच्या आजाराबाबत माहिती सांगितली होती.

त्यासाठी येणारा खर्च देखील खूप मोठा असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र त्यांच्यासमोर आर्थिक संकट असल्याने ते जास्त काही करू शकले नाही.

Team Hou De Viral