अखेर बऱ्याच वर्षांनंतर ‘पूजा सावंत’ चे ‘ते’ स्वप्न झाले पूर्ण, जाणून घ्या काय होते स्वप्न

अखेर बऱ्याच वर्षांनंतर ‘पूजा सावंत’ चे ‘ते’ स्वप्न झाले पूर्ण, जाणून घ्या काय होते स्वप्न

अभिनेत्री पूजा सावंत ही अभिनयासोबतच एक उत्तम डान्सर असून महाराष्ट्राचा बेस्ट कोण या शोची जज देखील होती. या शोमध्ये तिने अतिशय जबरदस्त असे परीक्षण केले होते. तिचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या व्हिडिओमध्ये ती धमाल डान्स करताना दिसत आहे.

पूजा सावंत हिने या आधी देखील अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये देखील काम केले आहे. आपल्या अभिनयाने तिने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले आहे. अंकुश चौधरी सोबतची तिची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. पूजा सावंत हिने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये येण्यापूर्वी खूप मोठा स्ट्रगल केला आहे.

पूजा सावंत ही आपल्या आपल्या सोबत समाज कार्यामध्ये देखील सक्रिय असते. तसेच प्राण्यांविषयी देखील ती आपली आस्था बाळगून असते आणि त्याबद्दल ती कार्य करत असते. पूजा सावंत हिचा जन्म 25 जानेवारी 1990 रोजी झाला आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. पूजा सावंत हिचा दगडीचाळ हा चित्रपट प्रचंड चालला होता.

यातील तिच्या भूमिकेचे सगळ्यांनीच कौतुक केले होते. त्याचप्रमाणे लपवाछपवी, भेटली तू पुन्हा, निळकंठ मास्तर यासारख्या चित्रपटातही तिने काम केले. तिच्या या चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. विशेष दगडी चाळ चित्रपटातील तिची भूमिका अतिशय जबरदस्त अशी झाली होती.

ती आता हिंदी चित्रपटातही काम करत असल्याचे सांगण्यात येते. हिंदीतील एक चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. काही महिन्यापूर्वी तिने एका घुबडाला जीवनदान दिले होते. सोशल मीडियावर या बाबतचा व्हिडिओ शेअर केला. पूजा सावंत ही प्राण्याप्रती फार जागरूक आहे.

काही वर्षांपूर्वी तिने एक घुबडाला जीवनदान दिले होते. एक घुबड पाण्याच्या टाकीत पडले होते. त्यानंतर पूजा सावंत हिने त्या घुबडाला ताबडतोब बाहेर काढले आणि एका मोठ्या बॉक्स मध्ये ठेवले. नंतर तिने डॉक्टरकडे देखील नेले होते. त्यानंतर त्या घुबडाच प्राण वाचला होते. पूजाचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी तिचे कौतुक देखील केले होते.

पूजा सावंतच्या घरी खारुताई, मांजर असे प्राणीदेखील आहेत. या प्राण्याची ती चांगल्या प्रकारे निगा देखील राखत असते. आता पूजा सावंत हिचा एक व्हिडिओ आणखीन व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ म्हणजे तिचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण झाले आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणते की, माझे अपूर्ण स्वप्न पूर्ण झाले आहे.

तिचे स्वप्न म्हणजे लता मंगेशकर यांच्या बाबतीतले होते. त्यांच्या गाण्यावर मी नृत्य करावे, हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होतं. झी महा गौरव च्या निमित्ताने हे स्वप्न पूर्ण झाले आहे. तमाम मराठी चित्रपटसृष्टी कडून गानकोकीळा लता मंगेशकर यांना मानवंदना देताना माझा छोटासा खारीचा वाटा.

झी महा गौरव 2022 हा पुरस्कार सोहळा 27 मार्च रोजी सात वाजता प्रसारित होणार आहे, असे तिने म्हटले आहे.

Team Hou De Viral