‘गुडन्यूज’ ! तब्बल ‘8’ वर्षानंतर ही लोकप्रिय मालिका पुन्हा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीस

‘गुडन्यूज’ ! तब्बल ‘8’ वर्षानंतर ही लोकप्रिय मालिका पुन्हा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीस

गेल्या काही वर्षांमध्ये अनेक विनोदी शो हे मराठी मालिकांवर सुरू आहेत. त्यामध्ये चला हवा येऊ द्या हा प्रामुख्याने गाजत आहे, तर महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शोदेखील चालत आहे. या शोमध्ये अनेक कलाकार काम करत असतात.

डॉक्टर निलेश साबळे, भारत गणेशपुरे, सागर करंडे यासह इतर कलाकारही काम करतात. त्याचबरोबर श्रेया बुगडे ही देखील या शोमध्ये दिसते. आता हास्य जत्रा या शोमध्ये काम करणारी अभिनेत्री हा शो सोडून जात असल्याचे सांगण्यात येत आहे. विनोदी अभिनयाने विशाखा सुभेदार हिने फू बाई फू ,बुलेट ट्रेन, हास्यजत्रा या कार्यक्रमांच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर आपले स्थान निर्माण केले आहे.

विनोदी अभिनयासोबतच विशाखा आपल्या नृत्यामुळे देखील ओळखली जाते आहे. विशाखा सुभेदार च्या कुर्रर्रर्रर्र या नाटकाचे सध्या रंगभूमीवर प्रयोग सुरू आहेत.या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद खांडेकर ने केले आहे. पॅडी कांबडे, प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव या नाटकात मुख्य भूमिकेत आहेत.

विशाखा सुभेदार हिनेदेखील फु बाई फु एक शोमध्ये आपल्या अफलातून अभिनयाने सगळ्यांचेच मन जिंकले होते, तर फु बाई फु हा शो अनेकांना मोठे करून गेला. गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपट सृष्टी मध्ये विनोद वीरांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भाऊ कदम हे त्यातीलच एक नाव. भाऊ कदम यांनी अतिशय हालाखीच्या परिस्थितीमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

फु बाई फु या शोमध्ये देखील त्यांनी काही दिवस काम केले होते. आता सर्व प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की, फु बाई फु हा शो आता पुन्हा एकदा नव्याने लवकरच सुरू होणार आहे. याबाबतची माहिती नक्कीच समोर आली आहे. फु बाई फु हा शो येत्या तीन नोव्हेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची समजते. हा शो आठ वर्षापूर्वी सुरू होता.

मात्र, चार वर्षे चालल्यानंतर हा शो बंद करण्यात आला होता. त्यावेळेस स्वप्निल जोशी आणि निर्मिती सावंत हे या शोच्या परीक्षेच्या भूमिकेत होते. मात्र, आता या शोच्या परीक्षेच्या भूमिकेत निर्मिती सावंत आणि उमेश कामत हे असणार आहेत. तर सूत्रसंचालन करताना आपल्याला मराठीतील ग्लॅमर्स अशी वैदही परशुरामी दिसणार आहे.

तर फु बाई फु हा शो पाहण्यासाठी आपण उत्सुक आहात का आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral