‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेमध्ये होणार या दमदार अभिनेत्रीची एन्ट्री, शुभम सोबत रंगणार प्रेम कहानी

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेमध्ये होणार या दमदार अभिनेत्रीची एन्ट्री, शुभम सोबत रंगणार प्रेम कहानी

स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू असलेली “फुलला सुगंध मातीचा” ही मालिका सध्या प्रचंड गाजताना दिसत आहे. कारण आता या मालिकेमध्ये नवा ट्विस्ट येणार आहे. या मालिकेमध्ये एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार असल्याचे सांगण्यात येते. आज आम्ही आपल्याला याबाबतची माहिती देणार आहोत.

गेल्या काही भागांमध्ये आपण या मालिकेत वेगवेगळे ट्वीस्ट पाहिले आहेत. शुभम आणि जान्हवी हे मुलगा पाहण्यासाठी दुसऱ्या गावाला जातात. त्यानंतर दिलीपच्या आई या जिजी आक्का यांना फोन करतात आणि सांगतात की, कार्यक्रम खूप छान झाला हो. मुलगी पण खूप सुंदर आहे आणि तिचा स्वभाव खूप चांगला आहे, असेही त्या सांगतात.

मात्र, तुम्ही हे बरं केलं की, जान्हवी सोबत खोटे दागिने दिले, नाहीतर आजच्या काळामध्ये लोक दागिने चोरून नेतात. हे ऐकून जीजी अक्का यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्यानंतर त्या फोन ठेवून देतात. नंतर त्या लगेचच जान्हवी हिला विचारतात की तुझा खरा नेकलेस कुठे आहे, त्यावर जान्हवी हिला आठवते की ब्युटी पार्लर मध्ये आपला नेकलेस चोरीला गेला आणि ती महिला परत देण्यास नकार देत होती.

त्यामुळे ती खोटं बोलते आणि शुभम दादा याच्या बॅगमध्ये मी नेकलेस ठेवला होता आणि चार तास तो आलाच नाही. त्यामुळे मला नेकलेस घालता आला नाही. त्यानंतर तेवढ्यात शुभम तेथे येतो आणि शुभम याला देखील जिजि अक्का विचारतात त्यावर तो काहीच बोलत नाही. त्यानंतर तेथे त्याचा भाऊ येतो आणि सांगतो की वहिनीच्या एडमिशन साठी शुभम दादा हा शिर्डीला गेला होता.

त्यावर सोनाली वहिनी देखील शुभम याला बोलू लागतात. अशाप्रकारे सर्वजण त्याच्यावर तुटून पडतात, असे आपण गेल्या काही भागांमध्ये या मालिकेत पाहिलेले आहे. मात्र, जान्हवी हिचा नेकलेस ब्युटी पार्लर मध्ये राहिला असतो. आता शुभम जीजी आक्का यांना किर्तीला आयपीएस ट्रेनिंग साठी हैदराबादला जाऊ देण्यासाठी मागणी करतो.

मात्र, सुरुवातीला त्या मान्य करत नाहीत. मात्र कालांतराने कीर्तीला ट्रेनिंगसाठी जाण्यासाठी परवानगी देतात. त्यानंतर कीर्ती ही हैदराबादला आता ट्रेनिंगसाठी गेलेली आहे. त्याच वेळी शुभमच्या आयुष्यात आता नवीन वादळ येणार असल्याचे संकेत मिळत आहे. कारण या मालिकेमध्ये आता एका अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे.

या अभिनेत्रीचे नाव मीरा जोशी असे आहे. या मालिकेमध्ये ती शुभम याची मैत्रीण दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे आता या मालिकेत काय घडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मीरा जोशी हिने या आधी देखील “श्रीमंताच्या घरची सून” या मालिकेत काम केलेले आहे. “सारे तुझ्यासाठी” ही मालिका चांगलीच गाजली होती.

ऑक्टोबर 2020 रोजी तिने गुरु दिवेकर या अभिनेत्यासोबत लग्न केले आहे. गुरु आधी आपल्याला शुभमंगल ऑनलाइन या चित्रपटात दिसला होता.

Team Hou De Viral