‘फुटाणे’ खाऊन मिळवा ‘या’ मोठमोठ्या आजारांवर नियंत्रण.. जाणून घ्या फुटाणे खाण्याचे चमत्कारिक फायदे..

‘फुटाणे’ खाऊन मिळवा ‘या’ मोठमोठ्या आजारांवर नियंत्रण.. जाणून घ्या फुटाणे खाण्याचे चमत्कारिक फायदे..

भारतीय आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या वनस्पती आपण ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. या वनस्पती चे सेवन केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये चमत्कारिक बदल घडून येतात. तसेच अनेक आजारांवर मात देखील करता येऊ शकते. गुळवेल किंवा इतर अशा वनस्पती आहेत की, या वनस्पतीचे सेवन केल्यावर अनेक आजार हे अजिबात जवळ येत नाही. तसेच भारतीय मसाले देखील अशाच प्रकारचे आहेत. या मसाल्याच सेवन करून आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतात.

भारतीय आहारामध्ये अजून एक असा पदार्थ आहे त्याचे सेवन केल्याने आपण तंदुरुस्त राहून ताणतणावापासून मुक्त राहू शकता. आम्ही आपल्याला फुटाणे याबद्दल माहिती घेणार आहोत. आपण फुटाने अनेकदा स्नॅक्स म्हणून खाल्लेले असतील. मात्र, फुटाणे खाण्याचे अनेक फायदे असतात आणि खाल्ल्यानंतर आपल्याला ताजेतवाने वाटते. याचा खूप मोठा फायदा होतो. चला तर मग जाणून घेऊया फुटाणे खाण्याचे फायदे..

1) हाडांना बळकटी –

पूर्वीच्या काळी सकस आहार असल्यामुळे वयोवृद्ध लोक आजही काटक असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. याचे कारण म्हणजे त्यांचा आहार विहार होय. चांगला आहार घेऊन ते अतिशय तंदुरुस्त राहत असत. आजकालचे तरुण हे बाहेरचे खाऊन आजारांना निमंत्रण देत असतात. तसेच त्यांचे हाडे देखील अतिशय ठिसूळ होतात. आपण फुटण्याचा आहारामध्ये समावेश करून हाडांना बळकटी मिळवून देऊ शकतात. कारण की यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअमची मात्र भरलेली असते. याचे सेवन केल्याने आपल्या शरीराला कॅल्शियम मोठ्या प्रमाणात मिळते आणि हार्ड बळकट होतात.

2) वजन नियंत्रणात राहते –

आजकाल तरुण किंवा लहान मुल पाहिले तरी आपल्याला अतिशय वजनदार असल्याचे दिसतात. याचे कारण म्हणजे अनेक लहान मुले हे बाहेरचे खातात. जंकफूडमुळे त्यांच्या वजनात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कचोरी, समोसा फरसाण आणि तत्सम पदार्थ खाऊन हे लहान मुले आपले वजन बिघडण्यास कारणीभूत ठरत आहेत. याकडे त्यांच्या पालकांचे लक्ष नसते. घरातील आहार घेतल्यास वजन वाढीची समस्या उद्भवत नाही. आपण जर फुटाणे यांचे सेवन केल तर आपले वजन हे नियंत्रणात राहू शकते.

3) अतिरिक्त चरबी –

आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होते. मात्र, याकडे अनेकांचे दुर्लक्ष होते. अतिरिक्त चरबी निर्माण झाल्याने तुमचे कोलेस्ट्रॉल वाढते आणि त्यामुळे तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अतिरिक्त चरबी ही उपयोगाची नसते. आपण फुटाणे सेवन करून अतिरिक्त चरबी कमी करू शकतात. त्यामुळे दैनंदिन आहारामध्ये दररोज फुटण्याचे सेवन करावे. त्यामुळे अतिरिक्त चरबी शरीरावरही जमा होत नाही.

4) मानसिक तणाव –

आजकालच्या जमान्यामध्ये अनेकांना मानसिक तणावाची समस्या निर्माण होत असल्याचे आपण पाहिले असेल. मानसिक तणाव निर्माण झाल्याने अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. तसेच घरातील वातावरण देखील मानसिक तणावामुळे हे बिघडले जाते. त्यामुळे मानसिक तणावावर नियंत्रण ठेवणे अतिशय गरजेचे असते. बाजारामध्ये मानसिक तणाव दूर करण्यासाठी अनेक औषधे मिळत असतात. मात्र, अशी औषधे न घेता आपण केवळ दररोजचा दररोज फुटाणे खाऊन मानसिक तणावावर नियंत्रण मिळू शकतात. फुटाणे खाल्ल्याने आपल्याला ताजेतवाने वाटते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा

Team Hou De Viral