गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास आहे.. हे घरगुती रामबाण उपाय करा.. गॅस पळला म्हणून समजाच..

गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास आहे.. हे घरगुती रामबाण उपाय करा.. गॅस पळला म्हणून समजाच..

सध्या घरामध्ये नवरा आणि बायको दोघेही नोकरी करणारे असल्यामुळे घरी स्वयंपाक करणे हे महिलांना जास्त प्रमाणात शक्य होत नाही. त्यामुळे अनेक जण बाहेरचे जेवण करतात. यामुळे आपल्याला बद्धकोष्टता आणि गॅसची समस्या निर्माण होऊ शकते. अन्नाचे पचन व्यवस्थित झाले नाही आणि आपल्या तोंडात जेवताना बाहेरची हवा गेल्यास याची निर्मिती होते. त्यामुळे अनेकांना जास्त त्रास होतो. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये गॅस आणि बद्धकोष्टता यावर काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्याने आपल्याला गॅस आणि बद्धकोष्टची समस्या ही नक्कीच कमी झाल्याचे पाहायला मिळेल.

1) लिंबू पाणी व अद्रक : अनेकांना बद्धकोष्टतेचा त्रास होतो. असे लोक औषधोपचार करतात. मात्र, काही फरक पडत नाही. आपण घरगुती उपाय केल्यास आपल्याला नक्की फरक पडू शकतो. आपण नियमितपणे लिंबू पाणी घ्यावे. तसेच त्यासोबत अद्रक खावे. यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढते. अद्रका मध्ये हिरबन नावाचा घटक असतो. यामुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि आपल्याल गॅस आणि बद्धकोष्ठता होत नाही.

2) मिश्रण : आपल्याला बद्धकोष्ट समस्या असेल तर आपण एका वाटीमध्ये लिंबाचा रस काढून घ्यावा. त्यामध्ये मीठ, अद्रक टाकावे. त्यानंतर त्यामध्ये एक अद्रकाचा तुकडा टाकावा. हे मिश्रण मिसळून आपण नंतर अद्रकाचा तुकडा खाऊन घ्यावा. आपली बद्धकोष्टताची समस्या व गॅसची समस्या ही नक्कीच दूर होऊ शकते.

3) सुंठ : बाहेरचे खाणे यामुळे अनेकांना ही समस्या निर्माण होते. तसेच सकाळी उठल्या उठल्या संडास देखिल साफ होत नाही आणि त्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. अशा लोकांनी सुंठ पावडर हरड पावडर एकत्रित करून याचे मिश्रण नियमित खावे. यामुळे आपल्याला गॅस आणि बद्धकोष्टता होणार नाही.

4) काळे मीठ : काळ मिठामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी अक्सिडेंट तत्व असतात. काळे मीठ प्रतिकारशक्ती वाढवणारे देखील असते. आपण बद्धकोष्टता आणि गॅस समस्या असेल तर काळे मीठ आणि हळद याचे मिश्रण करून गरम पाण्यामध्ये घ्यावे. असे केल्याने आपली बद्धकोष्टता समस्या दूर होते. हळदीमध्ये ऑंटी ऑक्सीडेंट तत्व असतात. त्यामुळे आपल्याला अल्सरची समस्या देखील दूर होऊ शकते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral