गॅसची समस्या भेडसावते तर हे करा उपाय.. आपल्याला कधीच होणार नाही गॅस…

गॅसची समस्या भेडसावते तर हे करा उपाय.. आपल्याला कधीच होणार नाही गॅस…

जर आपल्याला पोटाची समस्या असेल तर आपल्याला गॅसची समस्या ही होऊ शकते. गॅस हा समजा चारचौघात सुटला तर आपल्याला अपमानाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे अनेकांची कुचंबणा होत असते. गॅसपासून बचाव करण्यासाठी अनेक जण उपाय करत असतात. मात्र, त्यांना काहीही फरक पडत नाही. नियमितपणे आपण व्यायाम करून यावर मात करू शकता. मात्र, अनेकांना धावत्या जीवनशैलीमुळे व्यायाम करणे शक्य होत नाही. त्यामुळे आपण आपले काही उपाय करून या समस्येवर मात करू शकता.

साधारणता जेवण झाल्यानंतर गॅस ही समस्याही निर्माण होते. जेवण झाल्यानंतर सहा तासानंतर बॅक्टेरिया तयार होतो. त्यानंतर गॅस समस्या निर्माण होते. मात्र, बहुतांश वेळी रात्रीच्या वेळी गॅस सुटण्याची समस्या अनेकांना असते. दिवसभर याचा त्यांना त्रास करावा लागत नाही. आम्ही आपल्याला आज या लेखामध्ये यावर काय उपाय करायचे याबाबत माहिती सांगणार आहोत.

1) जेवल्यानंतर फिरा : जर आपण रात्री जेवण करून तातडीने झोपत असाल, तर असे करू नका. यामुळे गॅस ही समस्याही निर्माण होऊ शकते. त्यामुळे जेवण झाल्यानंतर काही वेळ आपण फिरले पाहिजे. त्यानंतर दोन तासांनी झोपले पाहिजे. असे केल्यानंतर आपल्याला गॅसची समस्याही होणार नाही. हा प्रयोग आपल्याला सातत्याने करावा लागेल. त्यानंतरच आपल्याला फरक पडेल.

2) हाय फायबर जेवण टाळा : जर आपल्याला वेगवेगळे पदार्थ खाण्याची सवय असेल तर आपण ती खावे. मात्र, ज्या पदार्थांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आहे, ते जास्त खाणे टाळावे. यामुळे आपल्याला गॅस समस्या निर्माण होऊ शकते. मात्र, फायबर हे शरीराला गरजेचे आहे. त्यामुळे फायबरचे योग्य ते सेवन आपण केलेच पाहिजे. मात्र, त्याचा अतिरेक करू नये. यामुळे आपल्याला गॅसची समस्या होऊ शकते.

3) जेवणामध्ये अंतर ठेवा : जर आपण जेवण केलं तर पुन्हा एका तासानंतर लगेच काही खात असाल तर असे करू नका. विनाकारण खाणे कधीही टाळावे. आपल्या जेवनामध्ये किमान सहा तासाचे अंतर आपण ठेवावे, असे तज्ञ लोक सांगतात. त्यामुळे आपल्याला गॅस निर्माण होणार नाही.

4) लिंबू पाणी : गॅस निर्माण होण्याची समस्या होत असेल तर आपण लिंबूपाणी हे सातत्याने घेतले पाहिजे. लिंबू पाणी पिल्याने आपल्याला गॅस निर्माण होण्याची समस्याही होणार नाही आणि आपण यावर मात देखील करू शकता. मात्र, हा प्रयोग आपल्याला नियमितपणे करावा लागेल. त्यानंतरच आपल्याला फरक पडू शकतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral