पोट फुगणे आणि गॅसच्या समस्याला ‘या’ घरगुती उपायांनी एका झटक्यात पळवून लावा!

पोट फुगणे आणि गॅसच्या समस्याला ‘या’ घरगुती उपायांनी एका झटक्यात पळवून लावा!

अनावश्यक आणि अनियमित खानपानमुळे पोटात गॅस होण्याची समस्या आजकाल एक सामान्य समस्या झाली आहे. बऱ्याचदा आपल्यालाही ही समस्या झालेकी असेल. बर्‍याच वेळा गॅस तयार झाल्या मुळे छातीत किंवा शरीराच्या इतर भागामध्ये वेदना सुरू होतात. जेव्हा गॅस डोक्यात जातो तेव्हा आपल्याला उलट्या होणे सुरू होते.

गॅसमुळे, पोट फुगणे सुरू होते आणि अनेक पाचक संबंधित समस्या उद्भवतात. जर तुम्हाला गॅस होण्याची जरा जास्तच समस्या असेल तर त्याला हलक्यात घेऊ नका कारण असे करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. जर गॅस व्हायला लागल्यावर तात्काळ डॉक्टरांकडे जाणे शक्य नसते. अशा परिस्थितीत घरगुती उपचार हा रामबाण उपाय असतो. पोटात तयार होणारा गॅस घरगुती उपचारांद्वारे कसा दूर करू शकतो हे जाणून घेऊया…

घरघुती उपचार पुढीलप्रमाणे –

1) गॅसच्या समस्येने जगडत असलेल्या लोकांना दररोज उपाशी पोटी एक चमचा बेकिंग सोडा मध्ये लिंबू चा रस मिसळून पिण्याचा सल्ला दिला जातो. हे मिश्रण पिण्यामुळे आपल्याला गॅसच्या समस्येपासून त्वरित आराम मिळतो. हे एक प्रकारे इनो प्रकारे काम करते.

2) हिंग जिथे अन्नाची चव वाढवते, तिथे गॅसच्या समस्येमध्ये देखील फायदेशीर आहे. तुम्ही एका ग्लास गरम पाण्यात हिंग टाकून प्या. यामुळे गॅसची समस्या दूर होते. दिवसातून दोन ते तीन वेळा हिंग पाणी प्यावे.

3) जेवणानंतर ताक प्यायची सवय बर्‍याच घरांमध्ये प्रचलित आहे. विशेषत: उन्हाळ्याच्या मौसमात लोक अनेकदा ताक घेतात. त्यात काळे मीठ आणि ओवा मिसळून ते पिल्याने गॅसच्या समस्येपासून त्वरित आराम मिळतो.

4) स्वयंपाकघरात असलेली काळी मिरी देखील गॅसची समस्या दूर करते. काळी मिरीचे सेवन केल्याने गॅसच्या समस्येपासून आराम मिळतोच, शिवाय पचनही योग्य राहते. जर पोटात गॅस झाला असेल तर आपण दुधामध्ये मिरपूड पावडर टाकून पिऊ शकता.

5) दालचिनी देखील आपल्या स्वयंपाकघरात असतेच. हे देखील सेवन करणे गॅसची समस्या दूर करण्यात प्रभावी आहे. गॅसची समस्या असल्यास दालचिनी पाण्यात उकळवा आणि नंतर थंड झाल्यावर प्या. दररोज सकाळी रिकाम्या पोटी दालचिनीचे पाणी सेवन केल्यास आराम मिळतो. जर आपल्याला याची चव आवडत नसेल तर आपण त्यात मध घालू शकता.

6) लसूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. गॅसच्या समस्येमध्ये लसूण खाणे देखील खूप फायदेशीर आहे. जर पोटात गॅस असेल तर लसूणला जिरे, धणे सोबत उकळा आणि दररोज दोनदा प्या. गॅसची समस्या सुटेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप– या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral