कोट्याधीश बिझनेस फॅमिलीतील आहे गंभीरची Wife, अशी जगते रॉयल Life

कोट्याधीश बिझनेस फॅमिलीतील आहे गंभीरची Wife, अशी जगते रॉयल Life

माजी क्रिकेटर गौतम गंभीरची पत्नी नताशा जैन गंभीर खूप सुंदर आहे. दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात. अनेकदा त्यांचे फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांचे लग्न हे अरेंज्ड मॅरेज असल्याचं बोललं जातं, पण काही माध्यमांच्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर त्यांचा हा विवाह प्रेमविवाह आहे.

गौतम आणि नताशा यांचा विवाह 28 ऑक्टोबर 2011 रोजी झाला होता. नताशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिची फॅन फॉलोइंगही खूप जास्त आहे. नताशा राजघराण्यातील आहे. ती दिल्लीतील एका करोडपती उद्योगपतीची मुलगी आहे.

गंभीर आणि नताशा या दोघांनीही त्यांचे बालपण एकत्र घालवले आहे. लग्नापूर्वी दोघेही चांगले मित्र होते. नताशाची शैली आणि तिचा साधेपणा या दोन्ही गोष्टी तिच्या चाहत्यांना आवडतात. नताशा खूप सुंदर आहे. तिचे सौंदर्य नेहमीच चर्चेचे कारण बनते. नताशा जैन क्वचितच मीडियामध्ये पाहायला मिळते. पण तिची छायाचित्रे तिच्या सौंदर्याचा पुरावा देतात.

नताशाला डान्सची खूप आवड आहे. एका इव्हेंटमध्ये गंभीरनेच खुलासा केला की, नताशा अनेकदा त्याला डान्स करण्यास भाग पाडते. आणि तो त्यासाठी नकार देतो. गौतमचे त्याची पत्नी नताशावर खूप प्रेम आहे. दोघांना दोन मुलीही आहेत.

नताशा जैन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे सौंदर्य, तिची ड्रेसिंग सेन्स आणि तिची भव्य जीवनशैली नेहमीच लोकांमध्ये चर्चेचे केंद्र बनते. फोटो पाहिल्यानंतर नताशा जैन सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या नायिकांना टक्कर देते हे स्पष्ट होते.

Team Hou De Viral