मराठी मालिकांमध्ये दिसणाऱ्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यांचे झालेले आहेत ‘घटस्फोट’

मराठी मालिकांमध्ये दिसणाऱ्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यांचे झालेले आहेत ‘घटस्फोट’

मराठी मालिका विश्वामध्ये अनेक असे कलाकार आहेत की जे पती-पत्नी आहेत. आणि गेल्या अनेक वर्षापासून ते मराठी चित्रपट सृष्टी मध्ये सक्रिय आहेत. त्यामध्ये आपल्याला सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर यांचे नाव घेता येईल. त्याचप्रमाणे अशोक सराफ, निवेदिता सराफ यांचे नाव देखील आपल्याला घेता येईल.

मात्र, आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये मराठी चित्रपट सृष्टी मध्ये अलीकडच्या काळामध्ये अभिनेता पती-पत्नी असलेल्या जोडप्यांचे घटस्फोट झाले ते सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया..

स्वप्निल जोशी – स्वप्निल जोशी हा मराठी चित्रपट सृष्टीमधील आघाडीचा अभिनेता आहे. त्याचे पहिले लग्न अपर्णाच्या सोबत झाले. अपर्णा त्याची बाल मैत्रीण आहे. मात्र, काही वर्ष संसार केल्यानंतर या दोघांचा घटस्फोट झाला आहे. आता स्वप्निल याने दुसरे लग्न केले असून त्याच्या पत्नीचे नाव लिना आराध्ये असे आहे.

शशांक केतकर – शशांक केतकर सध्या आपल्याला मुरंबा या मालिकेमध्ये दिसत आहे. त्याची ही मालिका प्रचंड गाजत आहे. शशांक केतकर याने काही वर्षांपूर्वी आपली सह कलाकार तेजश्री प्रधानच्यासोबत लग्न केले होते. मात्र, या दोघांमध्ये अवघ्या सहा महिन्यातच घटस्फोट झाला. त्यानंतर शशांक याने प्रियंका ढवळे हिच्यासोबत लग्न केले.

अक्षर कोठारी – अक्षर कोठारी सध्या आपल्याला स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेमध्ये दिसत आहे. या मालिकेमध्ये त्याची भूमिका अतिशय लोकप्रिय झालेली आहे. अक्षर कोठारी याने मानसी नाईकच्यासोबत लग्न केले होते. मात्र, या दोघांचाही घटस्फोट झालेला आहे.

विजय अंधाळकर – विजय अंधाळकर हा मराठी चित्रपट सृष्टीमधील सध्याचा आघाडीचा अभिनेता म्हणावा लागेल. विजय अंधारकर याने देखील अभिनेत्री पूजा पुरंदरे हिच्या सोबत लग्न केले होते. मात्र, या दोघांचा काही वर्षातच घटस्फोट झाला. आता दोघेही वेगळे राहतात.

Team Hou De Viral