‘गोलमाल’ मधल्या वसुली भाईची झाली अशी अवस्था; पांढरी दाढी, वाढलेले केस पाहून चाहते हैराण

‘गोलमाल’ मधल्या वसुली भाईची झाली अशी अवस्था; पांढरी दाढी, वाढलेले केस पाहून चाहते हैराण

गोलमाल ( Golmaal ) हा चित्रपट पाहिला नसेल असा विराळाच. गोलमाल ( Golmaal )हा चित्रपट जुन्या काळात देखील आला होता. अमोल पालेकर यांनी आपल्या अभिनयाने चारचाँद लावले होते. मात्र सध्याच्या जमान्यात गोलमाल म्हटले की, आपल्याला रोहित शेट्टी ( Rohit Shetty ) आणि त्याची कंपनी आठवते. रोहित शेट्टी आणि गोलमाल सिरीजवर दोन ते तीन चित्रपट केले आहेत.

गोलमाल सिरीज मध्ये आपण अनेक कलाकार पाहिलेले आहेत. त्यामध्ये काही कलाकार हे ठराविकच आहेत. त्यात अजय देवगन ( Ajay Devgan ) हा कायम आहे, तर गोलमाल सीरिजमध्ये आपल्याला करीना कपूर, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, अर्षद वारसी यांनी एकत्र धमाल केल्याची पाहायला मिळाली. गोलमालमध्ये कुणाल खेमू हा देखील दिसला होता.

मात्र या सगळ्यांमध्ये भाव खाऊन गेले होते ते मुकेश तिवारी ( Mukesh Tiwary ). मुकेश तिवारी यांनी गोलमाल चित्रपटांमध्ये वसुली भाईची भूमिका अशा पद्धतीने साकारली की, त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. आजही त्यांना वसुली भाई या नावाने अनेक जण ओळखतात. अभिनयाच्या जोरावर मुकेश तिवारी यांनी आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे.

चरित्र, विनोद, खलनायक अशा प्रकारच्या सगळ्याच भूमिका त्यांनी केलेल्या आहेत. मुकेश तिवारी यांनी सगळ्यात आधी काम केलेला चित्रपट म्हणजे चायना गेट. या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट यशस्वी झाला होता. मात्र, आता मुकेश तिवारी यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

यामध्ये मुकेश तिवारी हे अतिशय वेगळ्या पद्धतीने दिसताहेत. मुकेश तिवारी यांनी 98 साली चायनागेट या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. चित्रपटात त्यांनी जगिरा हे पात्र साकारले होते. ‘मेरा मन माया कुत्ता काट खाया’ हा त्यांचा डायलॉग प्रचंड गाजला होता.

या प्रमाणे या चित्रपटातील त्यांच्या विशेष भूमिकेसाठी त्यांना गौरवण्यात देखील आली होते. त्याचबरोबर त्यांनी विविध चित्रपटात काम केले. यामध्ये अपहरण सारखा सुंदर चित्रपटात देखील त्यांनी केले. या चित्रपटांमध्ये त्यांनी पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. मुकेश तिवारी यांनी चायना गेट या चित्रपटानंतर मागे वळून पाहिलेच नाही.

त्यांनी फर्ज, धुंद, जमीन, अपहरण, संडे, हल्लाबोल या सारख्या चित्रपटात काम केले या सर्व चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या. काही चित्रपटात खलनायक तर काही चित्रपटात चरित्र अभिनेता व काही चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली. अपहरण चित्रपटात त्यांनी साकारलेला पोलिस अधिकारी आजही सगळ्यांनाच आठवतो.

मात्र गोलमाल मध्ये त्यांना वसुली भाईच्या भूमिकेने वेगळी ओळख मिळवून दिली. आता देखील गोलमालचा पुढचा भाग येणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. गेल्या बारा वर्षांमध्ये मुकेश तिवारी यांचा लूक हा अतिशय वेगळ्या पद्धतीने बदलला आहे. आता सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये मुकेश तिवारी यांचे केस विस्कटलेले दिसत आहेत.

Mukesh Tiwari

त्याचप्रमाणे ते पांढरेही झालेले दिसत आहेत. त्यामुळे मुकेश तिवारी यांना नेमके काय झाले अशी देखील विचारणा आता त्यांचे चाहते करताना दिसत आहेत, तर मुकेश तिवारी यांना काही झाले नसून त्यांनी हे सहजच फोटोशूट केले आहे, असे सांगण्यात येते, तर आपल्याला मुकेश तिवारी आवडतात का? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral