ऐन लग्नकार्यात गोंधळ उडणार, मल्हार अंतरा येणाऱ्या संकटाला कसे सामोरे जाणार?

ऐन लग्नकार्यात गोंधळ उडणार, मल्हार अंतरा येणाऱ्या संकटाला कसे सामोरे जाणार?

आपण अनेक हिंदी चित्रपट किंवा मराठी चित्रपटांमध्ये अशा घटना पाहिलेल्या असतील की, एखादे लग्न सुरू आहे आणि लग्न सुरू असतानाच नवरदेवाचे वडील नवरीच्या वडिलांना पैशाची मागणी करतात. जर पैसे नाही दिले तर आम्ही हे लग्न मोडू, असा सीन आपण अनेकदा पाहिला असेल. हा सीन आता अनेक चित्रपटात देखील पाहायला मिळतो.

आता काही मराठी मालिकांमध्ये देखील असे सीन वापरण्याची पद्धत पुन्हा एकदा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठी मालिकांमध्ये आता वेगवेगळ्या कलाकारांना संधी मिळताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न देखील सुटला आहे, तर आता अनेक मालिका सुरू होतात. मात्र, त्यासाठी मग कथादेखील लागतात. त्यामुळे नंतर मालिका विनाकारण वाढत जाते.

मात्र, अनेक अशा मालिका आहेत की ज्या प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहेत. सध्या मराठी मालिकांमध्ये “आई कुठे काय करते”, “सुख म्हणजे नक्की काय असतं”, “सहकुटुंब सहपरिवार” यासारख्या मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. तसेच आता नव्याने मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांची ,”माझी तुझी रेशमगाठी” ही मालिका देखील आता प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.

यामध्ये मायरा या छोट्या मुलीचे पात्र देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहे. तर दुसरीकडे “जीव माझा गुंतला” ही मालिका देखील आता प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या मालिकेमध्ये येणारे नवनवीन ट्विस्ट देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. या मालिकेमध्ये आता श्वेता आणि मल्हार यांचे लग्न होणार आहे. त्यामुळे आता या लग्न समारंभामध्ये गोंधळ उडतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मल्हार आणि श्वेताच्या लग्नाचा संगीत समारंभ आता सुरू झालेला आहे. संगीत समारंभामध्ये वेगवेगळे कार्यक्रम देखील सुरू आहेत. मात्र, त्याच वेळेस एक अचानक मोठी घटना घडते. अंतरा ही अचानकपणे मल्हार याला एका बाजूला घेऊन जाते आणि त्याला म्हणते विजय मानेचा मला मेसेज आलेला आहे आणि तो सांगत आहे की, साडेसात पर्यंत एक लाख रुपये मिळाले नाही तर मी लग्नात येऊन तमाशा करेल.

त्यामुळे मल्हार याच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव दिसू लागतात. तर दुसरीकडे बाहेर सगळे पाहुणे बसलेले असतात आणि संगीत कार्यक्रम सुरू होणारा असतो. त्याच वेळी मग अंतराही बाहेर येते आणि स्टेजवर श्वेता आणि मल्हार हे डान्स करत असतात. मात्र, त्याच वेळेस म्हलार याचे सर्व लक्ष अंतरा हिच्याकडे असते. त्यानंतर तिच्या मामीला ही बाब कळते आणि मामी ही अंतराला घेऊन बाजूला जाते.

तिला म्हणते, “तू हे काय करत आहेस, तुझ्या बहिणीचा होणारा नवरा आहे तो”, मात्र अंतरा हिला काहीच कळत नाही, मामी अशा का बोलत आहेत ते. दरम्यान, आता विजय माने हा मेख असून तो श्वेता चा बॉयफ्रेंड आहे आणि तो त्रास देण्यासाठी खोटे नाव घेऊन पैशाची मागणी करत आहे. त्यामुळे आता या मालिकेत नव्याने काय घडणार आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Team Hou De Viral