व्हायचं तेच झालं… करिष्मासंदर्भात गोविंदाने केलेली ‘ही’ भविष्यवाणी ठरली खरी

व्हायचं तेच झालं… करिष्मासंदर्भात गोविंदाने केलेली ‘ही’ भविष्यवाणी ठरली खरी

गोविंदा आणि करिश्मा कपूर यांची जोडी बॉलिवूडमध्ये अतिशय लोकप्रिय जोडी म्हणून गणल्या जाते. या दोघांनी अनेक चित्रपट केले आहेत. या जोडीचे चित्रपट हे प्रचंड गाजले आहेत. यामध्ये आपल्याला अनेक चित्रपटांचा समावेश करता येईल.

राजा बाबू, कुली नंबर 1 आणि इतर चित्रपटांचा समावेश करता येईल. खुद्दार चित्रपटातही या दोघांची जोडी प्रचंड गाजली. खुद्दार चित्रपटातील गीत देखील खूप लोकप्रिय झाले होते. गोविंदा चित्रपटसृष्टीमध्ये आपले करिअर करत होता, त्यावेळेस करिष्मा कपूर ही अतिशय लहान होती.

यावेळेस असाच एक किस्सा करिष्मा कपूरने नुकताच शेअर केला आहे. यामध्ये तिने गोविंदाने आपल्या भविष्याविषयी सांगितल्याचे म्हटले आहे. करिष्मा कपूर हिने देखील बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. करिष्मा कपूरने काम केलेले सगळे चित्रपट जवळपास हिट राहिलेले आहेत. मात्र, खाजगी आयुष्यामध्ये करिष्मा कपूर हिने अनेक संकटांना तोंड दिले.

करिष्मा कपूर हिने आनाडी या चित्रपटात लोकप्रिय भूमिका केली होती. या चित्रपटात ती व्यंकटेश याच्या सोब दिसली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. विशेष म्हणजे करिष्माची जोडी गोविंदा सोबत प्रचंड गाजली. यामध्ये तिचा खुद्दार हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटामध्ये करिष्मा कपूर हिने अंध तरुणीची भूमिका साकारली आहे, तर गोविंदा हा चित्रपटात वेगळ्या भूमिकेत आपल्याला दिसला आहे.

करिष्मा कपूर आणि गोविंदा यांच्या जोडीची चर्चा राजाबाबू या चित्रपटात प्रचंड झाली होती. या चित्रपटांमध्ये ‘सर काय लो खटिया’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय ठरले होते. करिष्मा कपूर हिने काही वर्षापूर्वी दिल्लीचा उद्योगपती संजय कपूर याच्यासोबत लग्न केले होते. लग्नाच्या अवघ्या काही वर्षातच या दोघांचा घटस्फोट झाला.

या जोडीला दोन मुलं असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर करिष्मा कपूर ही आपले वडील रणधीर कपूर यांच्यासोबत मुंबईतच राहते. अनेकदा करिष्मा कपूर ही आपली बहीण करिना कपूरच्यासोबत पार्ट्यांना जाताना दिसत असते. आता करिष्मा कपूर हिची काही वर्षापूर्वीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

या पोस्टमध्ये करिष्मा कपूर हिने म्हटले आहे की, ज्या वेळेस मी लहान होते, त्या वेळेस मी गोविंदा याची खूप मोठी फॅन होते. त्यामुळे मी माझ्या वडिलांना एकदा म्हटले होते की, गोविंदाला मला भेटायची इच्छा आहे. त्यानंतर गोविंदाला भेटण्याची संधी मिळाली. त्या वेळेस गोविंदा यांनी मला विचारले होते की, तुला मोठे होऊन काय व्हायचे आहे, त्या वेळेस मी म्हणाले होते की, मला अभिनेत्री व्हायचे आहे.

त्यानंतर गोविंदा म्हटला की, तू मोठी होऊन तू खूप मोठी अभिनेत्री होशील आणि गोविंदाने तो म्हटलेला शब्द अखेर भविष्यवाणीच्या रूपात खरा ठरला. करिश्मा कपूर ही पुढे जाऊन मोठी अभिनेत्री बनली. अशी आठवण करिश्मा कपूर हिने नुकतीच सांगितली आहे.

Team Hou De Viral