सुनीता नव्हे तर ‘या’ अभिनेत्रीशी लग्न करायचे होते गोविंदाला, या कारणास्तव त्यांचं लग्न होऊ शकलं नाही

सुनीता नव्हे तर ‘या’ अभिनेत्रीशी लग्न करायचे होते गोविंदाला, या कारणास्तव त्यांचं लग्न होऊ शकलं नाही

एकेकाळी गोविंदाच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना वेड लावले होते. गोविंदाने एक काळ गाजवला होता असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. पण याकाळात केवळ चित्रपटांमुळेच नाही तर पर्सनल लाईफमुळेही गोविंदा सतत चर्चेत असत.

होय, अनेक अभिनेत्रींसोबत गोविंदाचे नाव जोडले गेले. यातल्या एका प्रेमप्रकरणाची प्रचंड चर्चा झाली. ती म्हणजे, गोविंदा आणि नीलमच्या प्रेमप्रकरणाची. गोविंदा आणि नीलमने 10 चित्रपट एकत्र केलेत. यापैकी सहा सिनेमे सुपरहिट झालेत. यादरम्यान गोविंदा नीलमसाठी अक्षरश: वेडा झाला होता.

खरे तर पहिल्याच भेटीत तो तिच्यावर भाळला होता. पुढे तो तिच्यात गुंतत गेला अगदी सुनीताशी लग्न ठरले असतानाही तो तिच्यावर प्रेम करत होता. ११ मार्च १९८७ ला गोविंदाचे लग्न सुनीतासोबत झाले. पण लग्न व्हायच्या काही वर्षआधी गोविंदा नीलमच्या प्रेमात पडला होता. एकीकडे सुनीता आणि दुसरीकडे नीलम अशी त्याची अवस्था झाली होती.

त्या काळात नीलमशिवाय गोविंदाच्या मनात दुसरा कुठलाही विचार नव्हता. अगदी होणाऱ्या पत्नीसमोर म्हणजेच सुनीतासमोर तो नीलमची प्रशंसा करताना थकत नसे. एवढेच नाही तर तू सुद्धा नीलमसारखी बन, असेही तो सुनीताला म्हणायला लागला होता. सुनीता हे ऐकून प्रचंड चिडायची.

एकदा असेच झाले. पण यावेळी रागाच्या भरात सुनीता नीलमबद्दल असे काही बोलली की, गोविंदा संतापला. कारण गोविंदा नीलमबद्दल एक शब्दही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हता. झाले, यावरून त्याचे व सुनीताचे कडाक्याचे भांडण झाले. इतके की, गोविंदाने सुनीतासोबतचा साखरपुडाही मोडला. पण एवढे करूनही नीलम गोविंदाची होऊ शकली नाही.

गोविंदाच्या वडिलांना नीलम आवडत होती. त्यांचा या लग्नाला विरोध नव्हता. पण गोविंदाच्या आईचा या लग्नाला कडाडून विरोध होता. कारण त्यांनी गोविंदासाठी सुनीताला पसंत केले होते. आईपुढे गोविंदाचे काहीही चालले नाही. अखेर आईच्या इच्छेखातर गोविंदाने सुनीतासोबत लग्न केले.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral