बॉलिवूड हादरलं ! हा लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता अचानक झाला गायब ?

बॉलिवूड हादरलं ! हा लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता अचानक झाला गायब ?

सनी देओल म्हटले की, आपल्यासमोर एक डायलॉग आवर्जून समोर येत असतो. ‘ये ढाई किलो का हात जब उठता है, तो आदमी जिंदगी से उठ जाता है’, या डायलॉगने सनी देओल याला रातोरात स्टार बनवले होते. घायल या चित्रपटामध्ये सनी देओल यांनी अतिशय आक्रमक भूमिका केली होती.

हा चित्रपट त्याचा त्यावेळी प्रचंड चालला. या चित्रपटामध्ये राज बब्बर यांची भूमिका देखील होती. त्यानंतर सनी यांची दामिनी चित्रपटातील भूमिका देखील खुप गाजली. दामिनी या चित्रपटात त्यांच्यासोबत मीनाक्षी शेषाद्री दिसली होती. मीनाक्षी शेषाद्री ही ऋषी कपूर सोबत लग्न करून जाते आणि त्यानंतर ऋषी कपूर यांचा भाऊ हा मोलकरणीवर अत्याचार करतो आणि ते दृश्य मीनाक्षी शेषाद्री पाहते.

त्यानंतर मीनाक्षी शेषाद्री कोर्टात जाऊन साक्ष देतात आणि नंतर सनी त्यांचे हे प्रकरण लढतो. अशी या चित्रपटाची कथा होती. हा चित्रपट त्या वेळी प्रचंड गाजला होता. यामध्ये अमरीश पुरी आणि सनी देओल यांच्यातील जुगलबंदी ही खूप गाजली होती. त्यानंतर सनी देओल यांनी अनेक चित्रपटात काम केलेले आहे.

सनी यांचा गदर एक प्रेम कथा या चित्रपटाला नुकतेच वीस वर्ष पूर्ण झाले आहेत. 2001 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटासमोर त्यावेळेस लगान चित्रपटाचे आव्हान होते. मात्र, असे असतानाही सनी यांचा हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले होते. आता या चित्रपटाचा दुसरा भाग देखील प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र, असे असतानाही सनी यांच्यासोबत अनेक अभिनेत्रींनी त्यावेळेस काम करण्यास नकार दिला होता. यामध्ये अनेक दिग्गज अभिनेत्रींचा समावेश होता. अभिनेता सनी देओल याचे वय सध्या 65 वर्षाचे आहे. सनी देओल हा 65 वर्षाचा असला तरी अतिशय तरुण तुर्क असा दिसतो. आता देखील सनी देओल याचा नवीन एक चित्रपट येणार असल्याचे सांगण्यात येते.

सनी देओल हा पंजाबच्या गुरुदासपूर येथील भाजपचा खासदार आहे. भाजपकडून त्यांनी 2019 मध्ये निवडणूक लढवली होती. मात्र, दुर्दैवाने त्यानंतर सनी देओल गुरुदासपूर येथे फिरकला सुद्धा नाही. याबाबत अनेकदा सनी देओल बेपत्ता असल्याच्या तक्रारी आणि पोस्टर देखील लागले होते.

आता देखील सनी देओल याला कोणी पाहिले आहे का? हा अभिनेता व गुरुदास पूर येथील खासदार बेपत्ता झाला आहे, असा रोष तेथील नागरिकांनी व्यक्त करत अनेक ठिकाणी सनी देओल याच्या नावाचं पोस्टर चिटकवली आहेत, तर आता सनी देओल याबाबत काय बोलतो हे पाहणे फार मजेशीर ठरणार आहे.

Team Hou De Viral