कॅप्टन ‘हार्दिक पांड्या’च्या ‘या’ चुकीमुळे जिंकलेली मॅच झाली ‘टाय’

कॅप्टन ‘हार्दिक पांड्या’च्या ‘या’ चुकीमुळे जिंकलेली मॅच झाली ‘टाय’

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना आज, मंगळवार, 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून मॅक्लीन पार्क स्टेडियमवर खेळला गेला.

कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या या मालिकेत टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळत आहे. त्याचवेळी या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टीम सौदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना यजमान न्यूझीलंड संघ 19.4 षटकात 160 धावा करत सर्वबाद झाला.

याला प्रत्युत्तर म्हणून पाहुण्या टीम इंडियाने 9 षटकात 4 गडी गमावून 75 धावा करत खेळत असताना पावसाने दणका दिला आणि सामना थांबवावा लागला. यानंतर मुसळधार पाऊस पडला आणि पंचांनी सामना अनिर्णित घोषित केला. म्हणजेच भारताने ही मालिका 1-0 ने जिंकली आहे.

न्यूझीलंडचा खेळ 19.4 षटकांत सर्वबाद 160 धावांवर आटोपला

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंड संघाची सुरुवात खराब झाली. अर्शदीप सिंगने डावाच्या दुसऱ्याच षटकात न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. त्याने फिन ऍलनला एलबीडब्ल्यू आऊट केले. यानंतर सिराजने मार्क चॅपमनला अर्शदीपकडे झेलबाद केले. चॅपमनला 12 धावा करता आल्या.

त्यानंतर डेव्हॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स यांनी न्यूझीलंडची धुरा सांभाळली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 63 चेंडूत 86 धावांची भागीदारी केली. किवी संघाने 16व्या षटकात दोन गडी गमावून 130 धावा केल्या. कॉनवे आणि फिलिप्स या दोघांनीही टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आठवी अर्धशतके झळकावली.

कर्णधार हार्दिक पंड्याच्या या चुकीमुळे सामना टाय झाला

एकेवेळेला भारतीय संघ डीएलएसनुसार फलंदाजी करत असल्याचे दिसत होते, परंतु शेवटच्या 3 चेंडूंवर पाऊस पडत असताना कर्णधार हार्दिक पांड्याने मोठी चूक केली, त्याने 9व्या षटकात केवळ 6 धावा केल्या. अखेरच्या षटकात त्याला माहीत होते की, भारताला हा सामना जिंकायचा असेल तर 9 षटकात 76 धावा कराव्यात, अन्यथा सामना एकतर भारताच्या हातातून जाईल किंवा तो बरोबरीत राहील आणि तसेच झाले, भारताच्या हातात विजय असतांना हार्दिक ने चूक केली आणि सामना टाय झाला.

Team Hou De Viral