येड्याचा बाजार ! बांगलादेशविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघातुन ‘कर्णधार’च गायब

येड्याचा बाजार ! बांगलादेशविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघातुन ‘कर्णधार’च गायब

BCCI ने नुकतेच बांगलादेश विरूद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे या संघात भारताचा भावी टी 20 कर्णधार हार्दिक पांड्याचेच नाव गायब आहे. या संघात रोहित शर्मा तसेच विराट कोहली पुन्हा दिसणार असून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

भारतीय संघ येत्या 4 डिसेंबरपासून बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ पहिल्यांदा तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने नुकतेच टीम इंडियाची घोषणा केली. अपेक्षेप्रमाणे विश्रांती संपवून भारताचा पूर्णवेळ कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली संघात परतले आहेत. अनुभवी खेळाडूंबरोबरच या संघात काही नव्या चेहऱ्यांचा देखील समावेश आहे.

मात्र आश्चर्याची बाब म्हणजे न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय टी 20 संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या हार्दिक पांड्याचा या संघात समावेश करण्यात आलेला नाही. बहुदा त्याला वर्ल्डकप आणि न्यूझीलंड दौऱ्यानंतर रोटेशन पॉलिसी अंतर्गत विश्रांती देण्यात आली असावी. मात्र याबाबत बीसीसीआयने अद्याप अधिकृत कोणताही माहिती दिलेली नाही.

भारतीय वनडे संघ पुढीप्रमाणे :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, इशान किशन, शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, कुलदीप सेन.

Team Hou De Viral