चित्रपटसृष्टी दुःखात ! प्रसिद्ध अभिनेत्याचे 72 व्या वर्षी दुःखद निधन, दोन ते तीन दिवसांपासून…

बॉलीवूड तसेच हॉलीवुड चित्रपट सृष्टीला गेल्या काही दिवसापासून धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहेत. अनेक कलाकार हे आपल्याला सोडून जाताना देखील दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वी भारताच्या गान कोकिळा असलेल्या लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्यानंतर बप्पी लहरी यांचेही निधन झाले.
संगीत क्षेत्रामुळे त्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली. त्याचप्रमाणे बॉलिवूडचे आघाडीचे गायक केके यांचे देखील निधन झाले. केके यांचे निधन हे अतिशय हृदय दायक होते. कारण एक शो करत असतानाच त्यांचा श्वास गुदमरला आणि त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
एखादा कलाकार इतक्या सहजासहजी कसा जाऊ शकतो, असा प्रश्न देखील या निमित्ताने चहात्यांना पडला होता. मात्र जन्म आणि मृत्यू हे आपल्या हातात नसते, हेच खरं. बॉलीवूडसह पाश्चात्त्य देशाला देखील याचा फटका आता मोठ्या प्रमाणात बसला आहे. आता देखील हॅरी पॉटर या चित्रपटात काम करणारे एका ज्येष्ठ कलावंताचे अशाच प्रकारे निधन झाले आहे.
त्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हॅरी पॉटर चित्रपटात रूबरस ही भूमिका करणारे अभिनेते रॉबी कोलट्रान यांचे नुकतेच निधन झाले आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. स्कॉटलंड जवळच्या त्यांच्या घराजवळ रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे. त्यांची प्रकृती दोन-तीन दिवसापासून ढासळली होती.
त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती अधिकच ढासळत गेली. त्यानंतर त्यांचे निधन झाले. हॅरी पॉटर या चित्रपटात त्यांनी साकारलेली ही भूमिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर त्यांना जगभरात लोकप्रियता मिळाली होती. त्यांच्या या पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते आणि नंतर देखील त्यांनी अशी भूमिका करावी, अशी मागणी देखील प्रेक्षक करत होते.

चित्रपटामध्ये दिसण्यापूर्वी त्यांनी फ्लॅश गार्डन आणि इतर मालिकात देखील काम केले होते. त्यांच्या मालिकातील भूमिका देखील लोकप्रिय ठरल्या होत्या. आता त्यांचे निधन झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.