पुन्हा भेटीला येणार ‘मॉनिटर’ हर्षद नायबळ !

पुन्हा भेटीला येणार ‘मॉनिटर’ हर्षद नायबळ !

सध्या सोनी मराठी या मराठी चैनल वर इंडियन आयडल मराठी हा शो सुरू झाला आहे. लोकप्रिय इंडियन आयडल हिंदी मधल्या शोच्या धर्तीवर हा मराठीमध्ये शो सुरू करण्यात आला आहे. या शोमध्ये अजय अतुल हे परीक्षकाच्या भूमिकेत आहेत, तर बेला शेंडे देखील त्यांना साथ देते. या शोमध्ये अनेक बाल कलाकार गायक सहभागी झालेली आहेत.

अफलातून असे गाणे ते सादर करत आहेत. त्याचप्रमाणे स्टार प्रवाह या वाहिनीवर देखील बालकलाकारासाठीच शो सुरू होणार आहे. गेल्या काही वर्षापासून असे बालकांसाठी शो सुरू आहेत. सगळ्यात आधी सारेगामा लिटल चॅम्प हा शो हिंदी मध्ये सुरू झाला होता.

त्यानंतर प्रादेशिक भाषांमध्ये देखील असेच शो सुरू करण्यात आले. आता मराठीमध्ये देखील असे अनेक शो सध्या सुरू आहेत. या लेखामध्ये असाच एक बालकलाकार सहभागी झाला आहे. त्याच्याबद्दल माहिती देणार आहोत. हर्षद नायबळ हा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्याने अनेक गाणी गायलेली आहेत.

अनेकांच्या गळ्यातला तो ताईत बनलेला आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी देखील त्याचे कौतुक केले आहे. काही वर्षांपूर्वी बालकलाकार आर्या आंबेकर हिनेदेखील रिॲलिटी शो मधूनच पदार्पण केले होते. आता आर्या आंबेकर एका शोचे सूत्रसंचालन करत असते. तीदेखील अशा छोट्या शो मधूनच वर आली होती.

तिने अनेक गाणे म्हणून रसिकांना मंत्रमुग्ध केले. आता ती आघाडीची गायिका बनलेली आहे. तर हर्षल नायबळ याने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. मुलाखतीमध्ये त्याने विविध प्रश्नांना उत्तरे दिलेली आहेत. मुलाखत घेणाऱ्या महिलेने त्याला विचारले की, तुझ आवडतं गाणं कोणत आहे, त्यावर त्याने तेरी दिवानी असं गाणं सांगितल आणि त्याने हे गाणे अतिशय सुरामध्ये गाणं गाऊन देखील दाखवले.

त्यानंतर मुलाखतकाराने त्याला प्रश्न विचारला की, तिचा आवडता कलाकार कोण आहे, त्यावर त्याने नाना पाटेकर असे सांगितले. तर त्यानंतर तो म्हणाला की, मला गाण्यामध्ये करिअर करायचे आहे. तुम्ही मला अभिनेत्यांबाबचे का प्रश्न विचारता. त्यानंतर त्याने एक मराठी भक्तीगीत देखील गाऊन दाखवले.

हे भक्तिगीत प्रचंड लोकप्रिय ठरलेले आहे. या मुलाखती दरम्यान त्याचे वडील देखील होते. त्याचे वडील म्हणाले की, हर्षद याला मी त्याच्या करिअर साठी पूर्ण पाठिंबा देत आहे. त्याला या करिअरमध्ये नाव कमावता येईल, असा मला विश्वास वाटतो असे ते म्हणाले.

Ambadas