हात थरथरत असल्यास गंभीर आजारांना मिळू शकते निमंत्रण.. जाणून घ्या कारणे..

हात थरथरत असल्यास गंभीर आजारांना मिळू शकते निमंत्रण.. जाणून घ्या कारणे..

आपण अनेकदा काही लोकांना चहा पिताना पाहिले असेल. चहा पिताना हातातही कप थरथरत असेल किंवा एखाद्या व्यक्तीला लिहिताना हा थरथरत असेल तर त्या व्यक्तीला काही हजार असू शकतो. मात्र, अशी समस्या हजारातील काही लोकांमध्ये असते. जर हात थरथर असेल, तर आपण याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. मात्र, काही लोक याकडे अतिशय गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे त्यांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. हात थरथरणे म्हणजे नेमके काय होते याची कारणे आपण आज या लेखांमध्ये पाहूया.

1) ॲनिमिया – अनेक लोकांना त्यांच्या शरीरात रक्त कमी असल्यामुळे हात थर थर तक्रारची समस्या होऊ शकते. त्यामुळे वेळीच डॉक्टरांना दाखवून हात थरथरत असल्याचे सांगावे. त्यानंतर आपल्याला आवश्यक गोळ्या भेटून आपल्याला ही समस्या दूर होऊ शकते. तसेच आपण घरगुती उपाय देखील करू शकता. यासाठी बीट आणि इतर फळे आपण खाऊ शकतो जेणेकरून आपली रक्त वाढ होईल.

2) रक्तदाब – अनेक लोकांना रक्तदाबाची समस्या मोठ्या प्रमाणात असते. मात्र, ते लोक रक्तदाबाची समस्या असून देखील त्याकडे दुर्लक्ष करतात आणि व्यसनाच्या आहारी जातात. त्यामुळे रक्तदाब वाढत जातो. यामुळे देखील हात थरथर करण्याची समस्या होऊ शकते. अशा लोकांनी वेळीच सावध होऊन धोका टाळला पाहिजे.

3) शुगर – अनेक लोकांना शुगरची समस्या असते. लो शुगर झाल्याने देखील हात थरथरु शकतो, असे झाल्यास आपण साखर खाल्ल्यावर आपल्याला बरे वाटते. मात्र, यावर कायम उपचार केला पाहिजे आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. जेणेकरून आपल्या पुढे हा त्रास होणार नाही.

4) बी १२ – भारतातील एकूण लोकसंख्येच्या 75 टक्के लोकांनाही ही समस्या असते. त्यात जे लोक शाकाहारी आहेत त्यांना बी १२ ची समस्या ही अधिक प्रमाणात असते. बी १२ हे मांसाहारी पदार्थ अधिक प्रमाणात असते आणि शाकाहारी लोक या समस्येची शिकार होऊ शकतात. त्यामुळे बी १२ ची समस्या झाल्याने देखील आपले हात थरथरु शकतात. त्या वेळी योग्य वेळी डॉक्टरांना दाखवून उपचार करावेत.

5) अनुवंशिकता – अनेक लोकांना हात थर थर ही समस्या असू शकते. अशा लोक डॉक्टरांकडे जाऊन सर्व तपासण्या देखील करतात. मात्र, त्यामध्ये काहीही निघत नाही. त्यावेळी हा आजार आनुवंशिकपासून आलेला आहे, असे समजावे आणि अधिक घाबरून न जाता डॉक्टरांच्या संपर्कात राहून यावर मात कशी करता येईल याकडे पाहावे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral