हेमा मालिनीला जबरदस्ती बिकिनी घालायला लावत होता एक दिग्दर्शक, या घटनेनंतर धर्मेंद्र यांनी केले असे काही…

हेमा मालिनीला जबरदस्ती बिकिनी घालायला लावत होता एक दिग्दर्शक, या घटनेनंतर धर्मेंद्र यांनी केले असे काही…

बॉलिवूडची ड्रीम गर्ल म्हणजेच हेमा मालिनी आणि धर्मेंद्रची प्रेमकथा खूप प्रसिद्ध आहे. अलीकडेच ड्रीम गर्लने आपला ७२ वा वाढदिवस साजरा केला आहे. हेमा जरी ७२ वर्षांची झाली असली तरीही तिच्या सौंदर्याची अजूनही चर्चा होत असते. धर्मेंद्र पाजीसुद्धा या सौंदर्यावर खूप प्रेमात पडले होते.

आजही या जोडप्याला एकत्र पाहून प्रत्येकजण म्हणतो “कधीही नजर ना लागो”. सर्वांना ठाऊक आहे की धर्मेंद्र पाजींनी आपले प्रेम मिळवण्यासाठी बरीच मर्यादा ओलांडली होती. विवाहीत व चार मुले असून सुद्धा धर्मेंद्रने हेमासोबत दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला.१९७९ मध्ये हेमाने धर्मेंद्रशी लग्न केले.

लग्न करण्यासाठी त्या दोघांनी आधी धर्म परिवर्तन केले होते असे म्हणतात. धर्मांतराच्या वेळी हेमा मालिनी हिने तिचे नाव आयशा बी ठेवले आणि धर्मेंद्र यांनी आपले नाव बदलून दिलावर खान असे ठेवले. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला या प्रेमळ जोडप्याबद्दल अशी एक रंजक गोष्ट सांगणार आहोत जी तुम्हाला कदाचित माहिती असेल.

काही काळापूर्वी हेमा मालिनी आपली मुलगी ईशा देओल सोबत एका शोमध्ये आली होती जिथे तिने मजेच्या दरम्यान तिच्याशी संबंधित सर्व खुलासे उघड केले.धर्मेंद्रच्या रागाबद्दल संपूर्ण इंडस्ट्रीला माहिती आहे. हेमा मालिनी आणि ईशा त्यांच्या ‘अम्मा मियां’ या पुस्तकाच्या जाहिरातीसाठी शोमध्ये आल्या होत्या.

हेमा मामिनी यांनी सांगितले की एकदा धर्मेंद्रने दिग्दर्शक सुभाष घई यांना झापड मारली होती.त्यानंतर त्यांच्या रागाची चर्चा सर्व इंडस्ट्रीमध्ये पसरली होती. ड्रीम गर्लने सांगितले की धर्मेंद्र ‘क्रोधी’ चित्रपटाचे शूटिंग करीत होता, मला धर्मेंद्रच्या विरुद्ध कास्ट करण्यात आले होते. हेमा म्हणाली की शूटिंग दरम्यान दिग्दर्शक सुभाष घई यांनी मला बिकीनी घालायला भाग पाडले, मी यासाठी तयार नव्हते, यामुळे मी बिकिनी घालण्यास नकार दिला.

हेमा म्हणाली की जेव्हा दिग्दर्शक सुभाषने मला सक्ती केली तेव्हा मी त्या दृश्याच्या शूटिंगसाठी बिकिनी परिधान केली आणि जेव्हा ते धर्मेंदला कळले तेव्हा तो संतापला आणि त्याने सुभाष घईला सेटवर झापड मारली आणि एक नाही तो सतत मारत राहिला. नंतर चित्रपटाचे दिग्दर्शक रणजितन धर्मेंद्रचा राग शांत केला पण धर्मेंद्र यांनी सुभाषला या घटनेविषयी कडक इशारा दिला.

या घटनेनंतर सुभाष घई खूप घाबरले होते. त्यांची चिंताग्रस्तता इतकी झाली होती की त्यानी तो सीन चित्रपटातून हटविला होता. धर्मेंद्र आणि हेमाशिवाय झीनत अमान आणि शशी कपूर यांनीही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. या घटनेनंतर धर्मेंद्र त्याच्या रागासाठी संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये चर्चेचा विषय बनला, बाकी इतर लोकसुद्धा त्याच्या रागाला घाबरू लागले होते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral