फक्त ‘त्या’ एका कारणास्तव हेमामालिनी यांचे सनी देओल आणि बॉबी देओल सोबत अजिबात जमत नाही

फक्त ‘त्या’ एका कारणास्तव हेमामालिनी यांचे सनी देओल आणि बॉबी देओल सोबत अजिबात जमत नाही

हेमा मालिनी यांना बॉलीवूडची ड्रीम गर्ल असे संबोधतात. आपल्या अभिनयाच्या जोरावर हेमामालिनी यांनी आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. बॉलिवुडमधील सर्वच अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केल्याचे आपण पाहिले असेल. मात्र, त्यांची जोडी ही खऱ्या अर्थाने धर्मेंद्र यांच्यासोबत चांगलीच गाजली.

धर्मेंद्र यांनी आज वयाचे ऐंशी वर्ष पार केले आहे. तर हेमामालिनी देखील 72 वर्षांच्या झालेल्या आहेत. हेमामालिनी यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1948 रोजी झालेला आहे. हेमा मालिनी यांनी इथू साथिया या तामीळ चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. हेमामालिनी यांनी त्यानंतर बॉलिवुडमध्ये आपली एन्ट्री केली.

शोले आणि इतर अशा हिट चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. सीता और गीता या चित्रपटात तर त्यांनी कमालच केली होती. धर्मेंद्र आणि हेमामालिनी एकत्र काम करत असताना अनेक रंजक किस्से घडले होते. धर्मेंद्र यांचे पहिले लग्न झालेले आहे आणि त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर असे आहे.

मात्र, असे असताना देखील धर्मेंद्र यांचा हेमामालिनी यांच्या वर जीव जडला होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सोबत लग्न केले. धर्मेंद्र यांना पहिल्या पत्नीपासून बॉबी देओल आणि सनी देओल ही मुलं आहेत. सनी देओल सध्या 64 वर्षाचा झालेला आहे. त्यामुळे हेमामालिनी आणि सनी देओल यांच्यामध्ये केवळ आठ वर्षांचे अंतर आहे.

हेमा मालिनी यांना धर्मेंद्र यांच्यापासून इशा देओल आणि आहना देओल या मुली आहेत.धर्मेंद्र यांच्याप्रमाणेच त्यांची मुले देखील बॉलिवूडमध्ये चांगलीच रमली आहे. मात्र, हेमामालिनी यांच्या दोन मुली असून एकीचे नाव ईशा देओल तर दुसरीचे नाव आहाना देओल असे आहे. त्यांना बॉलिवूडमध्ये काही खास कमाल करता आली नाही. ईशा देओल हिने काही चित्रपटात काम केले.

मात्र, त्यानंतर तिच्या पदरी निराशाच पडली. त्यानंतर तिने काही वर्षांपूर्वी लग्न केले असून ती संसारात रमली आहे. सनी देओल आणि बॉबी देओल हे त्यांची आई प्रकाश कौर यांच्या खूप जवळचे आहेत. त्यामुळे धर्मेंद्र यांनी हेमामालिनी यांच्याशी लग्न केल्यामुळे त्यांना अजिबात रुचले नाही. त्यामुळे आजपर्यंत यांच्यामध्ये अजिबात चांगले संबंध नाही.

ईशा देओल च्या लग्नाला सनी देओल आणि बॉबी देओल हे गेले नव्हते. मात्र, हेमामालिनी यांचा एक वेळेस अपघात झाला होता त्यावेळी सनी त्यांची विचारपूस करण्यासाठी गेला होता. मात्र, तरीदेखील दोन्ही कुटुंबात जास्त येणे जाणे नाही. एका मुलाखतीमध्ये हेमामालिनी यांनी सांगितले होते की, आपण सनी देओल आणि बॉबी देओल यांचा खूप आदर करतो.

मात्र, आमचे जाणे येणे फार कमी आहे. एक वेळेस सनी हा माझ्या घरी आला होता. धर्मेंद्र यांनी हेमामालिनी यांच्या सोबत लग्न केले हेच एक कारण आहे की, सनी देओल आणि बॉबी देओल हे हेमामालिनीचा याच कारणामुळे राग करतात. मात्र, असे असले तरी त्यांनी सत्य हे स्वीकारले आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral