प्रसिद्ध अभिनेता ‘हेमंत ढोमे’ आला अडचणीत, घडली खूपच मोठी दुर्दैवी दुर्घटना..

प्रसिद्ध अभिनेता ‘हेमंत ढोमे’ आला अडचणीत, घडली खूपच मोठी दुर्दैवी दुर्घटना..

सध्या अनेक अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या सोबत विचित्र घटना घडण्याचे प्रकार गेल्या काही दिवसापासून आपण पाहात आहोत. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री अभिज्ञा भावेच्यासोबत एक भयंकर प्रकार घडला होता. त्या रस्त्याने जात असताना हा प्रकार घडला होता.

रात्रीची पाळी संपवून अभिज्ञा भावे ही ऑटो मध्ये बसली होती आणि तिच्या हातामध्ये पर्स होती, तर रिक्षावाला रिक्षा कमी स्पीड मध्ये ऑटो चालवत होता. त्याच वेळी दुचाकीवरून मागून आलेल्या दोघांनी अभिज्ञा हिच्या हातातली पर्स हिसकावून घेतली आणि पळून गेले.

यामध्ये तिचा महागडा मोबाईल होता. याबाबत तिने पोलिसात तक्रार देखील दिली आणि सोशल मीडियावर माहिती देखील दिली. मोबाईल चोरीला गेला त्याचं काही नाही मात्र माझा त्यामध्ये वैयक्तिक डेटा आहे, असे तिने म्हटले होते. त्याचप्रमाणे अनेक अभिनेत्री अभिनेत्यांना देखील अशाच प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे.

काही दिवसापूर्वीच मन उडून झालं या मालिकेत काम करणारा अभिनेता अजिंक्य राऊत याच्या बाबतीतही असाच प्रकार घडला होता. अजिंक्य राऊत सध्या मन उडू उडू झालं या मालिकेमध्ये भूमिका साकारत आहे. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.

आपल्या भूमिकेबद्दल तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती देत असतो आणि ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तो माहिती देतो, तेच त्याचे अकाउंट हॅक झाले असे देखील सांगण्यात आले होते. त्यानंतर त्याने याबाबत पोलिसात तक्रारही दिली होती. सायबर पोलिसांनी याबाबत तपास करून त्याचे अकाउंट रिकव्हर केल्याचे सांगण्यात येते.

आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्याचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याची बातमी सोशल मीडियावर आली आहे. या अभिनेत्याचे नाव हेमंत ढोमे असे आहे. हेमंत हा अभिनेत्या सोबत दिग्दर्शन देखील करत असतो. त्याने अनेक मालिका चित्रपटात काम केले आहे. त्याचबरोबर त्याने दिग्दर्शन देखील उत्तम प्रकारे केले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून तो नेहमीच आपल्या चाहत्यांशी संपर्क असतो आणि संवाद साधत असतो. आपले वेगवेगळे फोटो देखील तो शेअर करत असतो. मात्र, आता हेमंत याचे सोशल मीडिया खाते हे हॅक झाल्याचे सांगण्यात आले आहे. तो ज्या माध्यमातून पोस्ट टाकतो ते त्याचे पहिले खातेच हॅक झाले आहे.

याबाबत त्याने सायबर सेल पोलिसांकडे तक्रार दिली आहे आणि खाते रिकव्हर लवकर करावे, अशी विनंती केली आहे. त्यामुळे आता त्याचे खाते कधी रिकव्हर होते हे आपल्याला लवकरच कळेल.

Team Hou De Viral