या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्रीचा झाला भीषण अपघात, प्रकृती अतिशय गंभीर..?

मराठी मनोरंजन विश्वामध्ये गेल्या काही दिवसापासून अतिशय विचित्र अपघात होत असल्याचे देखील समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी कल्याणी जाधव हिचा कोल्हापूर येथे अपघातात मृत्यू झाला होता. ती रस्त्यावरून पायी जात असताना एका तिला जोरदार धडक दिली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारदरम्यान तिचे निधन झाले.
अपघाताची मालिका येथेच थांबत नाही. तर गेल्या काही वर्षांमध्ये अपघातात अनेक कलाकारांचा मृत्यू झाला आहे. आनंद अभ्यंकर हे लोकप्रिय अभिनेते कार अपघातात मृत्युमुखी पडले होते. आनंद अभ्यंकर आणि त्यांचा सहकारी अक्षय पेंडसे हे मुंबईहून पुण्याला जात होते, त्यावेळेस त्यांचा अपघात झाला होता. यामध्ये अक्षय याच्या छोट्या मुलाचा देखील मृत्यू झाला होता.
ही अतिशय दुर्दैवी घटना अजूनही मराठी चित्रपट सृष्टी विसरू शकली नाही. एवढ्यातच हे प्रकरण थांबत नाही तर आजकालच्या अभिनेत्रींना देखील असे अपघातांना समोर जावे लागले आहे. आता देखील एका लोकप्रिय अभिनेत्रीला अशाच अपघाताला समोर जावे लागले आहे. ही अभिनेत्री इमली या मालिकेत काम करते. या मालिकेत ही अभिनेत्री अतिशय जबरदस्त रित्या काम करताना दिसत आहे.
या अभिनेञीचे नाव हेतल यादव असे आहे. हेतल यादव देखील अपघाता समोर गेली आहे. छोट्या पडद्यावर इमली ही मालिका सध्या प्रचंड गाजत आहे या मालिकेमध्ये शिवानी राणा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री देखील खूपच लोकप्रिय झाली आहे. हेतल यादव यांनी अनेक मालिका चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.
तिने अनेक चित्रपटातही काम केले आहे. हेतल यादव ही रात्रीच्या सुमारास घरी जात असताना तिचा एक भीषण अपघात झाला आहे. याबाबत तिने स्वतः सोशल मीडिया वरून आपल्या चहात्यांना माहिती दिली आहे, की मी घरी जात असताना भीषण अपघात झाला. कारचे खूप मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने या अपघातातून मी बचावले. किरकोळ दुखापत झाली. मात्र आता मी सुखरूप आहे.
गेल्या 25 ते 30 वर्षापासून हेतल यादव ही या क्षेत्राशी कार्यरत आहे. तिने पुढे सांगितले आहे की, या अपघातामध्ये मला दुखापत जरी झाली नसली तरी मी खूप घाबरले आहे. एका ट्रकने माझ्या कारला धडक दिली. त्यामुळे हा अतिशय विचित्र प्रकार होता. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली आहे आणि लवकरच याबाबत पोलीस तपास करतील, असे तिने सांगितले आहे.