सुशांतच्या मित्राचा मोठा खुलासा ! ब्रेकअपनंतरही अंकिता लोखंडेनं सांभाळून ठेवलीय ‘ही’ निशाणी

सुशांतच्या मित्राचा मोठा खुलासा ! ब्रेकअपनंतरही अंकिता लोखंडेनं सांभाळून ठेवलीय ‘ही’ निशाणी

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अनेक नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. काही सेलेब्स आणि फ्रेंड्स अनेक पोस्ट शेअर करत आहेत. दीर्घकाळापासून सुशांतचा मित्र राहिलेल्या संदीप सिंह यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेबद्दल लिहलेली ही लांबलचक पोस्ट सध्या सोशलवर वेगानं व्हायरल होत आहे.

संदीपनं त्याच्या इंस्टावरून एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शेअर केलेला फोटो होळीचा आहे ज्यात अंकिता, संदीप आणि सुशांत दिसत आहे. आपल्या पोस्टमध्ये संदीप म्हणतो, “माझ्या मनात ही गोष्ट वारंवार येत आहे की, काश आपण जास्त कठिण प्रयत्न केले असते आणि त्याला थांबवलं असतं.

त्याच्याकडे भीक मागितली असती. बघ तू त्याच्यापासून वेगळी झालीस तरीही तू त्याच्या यशासाठी प्रार्थना करत होतीस. तुमचं प्रेम खरं होतं. हे खूप खास होतं. तू अद्यापही सुशांतचं नाव तुझ्या घराच्या नेमप्लेटवरून हटवलं नाहीये.”आपल्या पोस्टमध्ये पुढं बोलताना संदीप म्हणतो, “मला ते सगळे दिवस आठवत आहेत, जेव्हा आपण लोखंडवालामध्ये कुटुंबासारखं रहात होतो.

आपण सोबत असे अनेक क्षण घालवले आहेत जे आठवल्यानंतर माझं मन रडत आहे. सोबत जेवण बनवणं, सोबत खाणं, मटण, भात, आपली लाँग ड्राईव्ह, कधी लोखंडवाला तर कधी गोव्याला जाणं, आपळं होळी साजरी करणं, ते हसणं, आयुष्यातील ते कमजोर क्षण, जेव्हा आपण एकत्र होतो तेव्हा तू सर्वाधिक जास्त सक्रिय होतीस.”

पोस्टच्या शेवटी संदीप म्हणतो, “ती फक्त तूच होतीस जी सुशांतच्या चेहऱ्यावर हसू आणू शकत होती. मला आजही असं वाटत आहे की, तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनले होतात. तुम्ही खऱ्या प्रेमाची मिसाल आहात. हे विचार आणि या आठवणींनी मन दु:खी होत आहे.मी त्याला कसं परत आणू शकतो.

मला त्याला परत आणायचं आहे. ते मालपुआ आठवतं का ? तो कसं लहान मुलासारखं माझ्या आईकडं मटन करी मागायचा. मला माहित आहे ती फक्त तूच आहेस जी त्याला वाचवू शकत होतीस.”

आमचे पेज लाईक करा.

Team Hou De Viral