हिवाळ्यात खा हिरवा चना.. आणि मिळवा अनेक आरोग्यदायी फायदे… जाणून घ्या फायदे…

हिवाळ्यात खा हिरवा चना.. आणि मिळवा अनेक आरोग्यदायी फायदे… जाणून घ्या फायदे…

हिवाळ्याची वाट अनेक जण आतुरतेने पाहत असतात. गळ्यामध्ये थंडी सोबतच इतर काही गोष्टी देखील घडत असतात. थंडी लागली की व्यायामाचे प्रमाण देखील खूप वाढत असते. या दिवसांमध्ये पोष्टिक लाडू खाण्याचे प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढते. तसेच हिवाळ्यामध्ये भाजीपाला हा अतिशय अस्वस्थ असतो आणि हिरवा भाजीपाला हा मोठ्या प्रमाणात येत असतो. यासोबतच मटार, चणे गाजर ही फळे देखील या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात येत असतात.

या फळांमध्ये मोठे औषधी गुणधर्म भरलेली असतात. त्यामुळे या फळांचे सेवन नियमितपणे केले पाहिजे. हिरवा चणा म्हणजेच आपले हरभरे. आपण हरभरे नेहमी खातो. मात्र, हिरवा चना हा कधीतरी खातो. हिवाळा सुरू झाला की टाहाळ म्हणजे ही हिरवा चना. हा मोठ्या प्रमाणात बाजारात विकायला येत असतो.याच्यामध्ये मोठे औषधी गुणधर्म भरलेली असतात. हा चना आपण फ्राय करून खाऊ शकता किंवा काच्चादेखील करून खाऊ शकता. याचे फायदे काय आहेत ते आपण जाणून घेऊया.

1) प्रोटीन – हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हिरव्या पालेभाज्या फार मोठ्या प्रमाणात येतात. त्यासोबतच हिरवा चना देखील मोठ्या प्रमाणात बाजारात येतो. हा चना आपण सहज खाऊ शकतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे, जीवनसत्वे भरलेले असतात. तसेच हिरव्या चाचण्यांमध्ये प्रोटीन देखील मोठ्या प्रमाणात असतात. त्याचे सेवन केल्याने आपले केस, डोळे हे निरोगी राहण्यास खूप मोठी मदत मिळते. त्यामुळे हिरव्या चण्याचे सेवन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये नक्की करावे.

2) विटामिन फोलेट – आपण बाजारातून गोळ्या किंवा औषधे घेऊन विटामिन युक्त कमतरता भरुन काढत असतो. मात्र, हिरवा चना खाऊन आपण विटामिन, फोलेट हे भरून काढू शकतो. त्यामुळे हिरव्या चण्याचे सेवन हे हिवाळ्याच्या दिवसात नक्की करावे. तसेच हिरव्या चाचण्यांमध्ये एंटीऑक्सीडेंट तत्व मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे आपण सर्दी खोकला यावर देखील मात करू शकता.

3) हृदय – आजकालच्या जमान्यामध्ये बाहेरचे खाण्याने अनेकांना हृदयाशी संबंधित आजार जडू लागले आहेत. तसेच तेलकट-तुपकट खाऊन यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपण हिरवा चना खाऊन आपले आरोग्य देखील तंदुरुस्त ठेऊ शकता.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral