विक्रम गोखलेंच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, अजूनही व्हेंटिलेटरवर…

विक्रम गोखलेंच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, अजूनही व्हेंटिलेटरवर…

प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर गेल्या पंधरा दिवसापासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोखले हे सध्या 82 वर्षाचे आहेत. गेल्या काही दिवसापासून त्यांच्या प्रकृतीमध्ये चढउतार होत आहेत मध्यंतरी विक्रम गोखले हे जग सोडून गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली.

अनेक प्रसिद्ध मीडिया हाऊसने देखील ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली. मात्र, त्यांच्या मृत्यूची खातरजमा न करताच ही बातमी दिल्याने अनेकांनी या माध्यमांवर टीका देखील केल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. विक्रम गोखले हे मराठी तसेच हिंदी चित्रपट सुट्टीतील आघाडीचे असे अभिनेते आहेत. त्यांनी अनेक मालिका, चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.

काही वर्षापूर्वी आलेला नटसम्राट या चित्रपटामध्ये त्यांनी नाना पाटेकर यांच्या सोबत अतिशय भन्नाट असे काम केले होते. त्यांच्या या भूमिकेची प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केले होते. मध्यंतरी केतकी चितळे हिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अतिशय घाण घाण या पद्धतीने टीका केली होती. त्यावेळेस देखील विक्रम गोखले यांनी एक पत्रकार परिषदेत घेऊन कशी मुस्कटदाबी सुरू आहे, याबद्दल भाष्य केले होते.

त्यानंतर देखील अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. विक्रम यांनी वजीर या चित्रपटात अतिशय जबरदस्त असे काम केले होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत अशोक सराफ दिसले होते. त्याचबरोबर अग्निपथ यासारख्या चित्रपटामध्ये त्यांनी अतिशय मोलाची भूमिका साकारली होती. सलमान खानचा हम दिल दे चुके सनम या चित्रपटातही त्यांनी जबरदस्त असे काम केले होते.

ऐश्वर्या राय तिच्या वडिलांची भूमिका त्यांनी साकारली होती. आता विक्रम गोखले यांचे निधन झाल्याची बातमी अनेकांनी देऊन टाकली. काही दिग्गज पत्रकारांनी देखील आपल्या फेसबुक अकाउंट वर त्यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र, त्यानंतर त्यांना कळाले की, त्यांचे निधन झाले नाही. मात्र कुठलीही खातर जमा न करता माहिती दिल्याने त्यांना टीकेचा सामना करावा लागला.

आता शनिवारी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांनी मेडिकल बुलेटीन जारी करून विक्रम गोखले यांच्या प्रकृतीची माहिती दिली. जनसंपर्क अधिकारी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, विक्रम गोखले यांची प्रकृती नाजूकच आहे. त्यांना सध्या व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलेले आहे. त्यांचा रक्तदाब देखील खाली वर होत आहे. त्यांच्यावर औषध उपचार चालू आहे.

शुक्रवारी त्यांच्या प्रकृती थोडी सुधारणा झाली होती. मात्र, शनिवारी आता त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे विक्रम गोखले यांच्याबाबत आता त्यांच्या चाहत्यांना फारच चिंता लागून राहिली आहे, तर विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना.

Team Hou De Viral