अभिनेत्री ‘हृता दुर्गुळे’ च्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; इन्स्टाग्रामवर पोस्ट करून दिली माहिती

अभिनेत्री ‘हृता दुर्गुळे’ च्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; इन्स्टाग्रामवर पोस्ट करून दिली माहिती

सध्या मन उडू‌ उडू झालं ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. ही मालिका झी मराठी या वाहिनीवर सुरू आहे. या मालिकेचे दिग्दर्शन, निर्मिती मंदार देवस्थळी यांनी केली आहे. मंदार देवस्थळी यांनी याआधी देखील अनेक मालिका चित्रपटांची निर्मिती केली आहे.

काही वर्षांपूर्वी त्यांनी आभाळमाया ही मालिका केली होती. या मालिकेमध्ये त्यांनी अतिशय जबरदस्तरित्या दिग्दर्शन केले. त्यांच्यासोबत विनय आपटे देखील या मालिकेचे दिग्दर्शक होते. त्यानंतरही त्यांनी अनेक मालिका केल्या. आता त्यांची मन उडू उडू झालं ही मालिका प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहे.

या मालिकेमध्ये इंद्रा आणि दिपू यांची प्रेम कहाणी दाखवण्यात आलेली आहे. नुकत्याच झालेल्या भागाष आपण असे पाहिले आहे की, इंद्रा आणि दीपू यांची एका टपरीवर भेट होते. इंद्रा याच्या हाताला मार लागलेला असतो. त्यावेळेस इंद्रा हृता हिला सांगतो की, आपण आता इथेच थांबू.

कारण की एका वसुली एजंटला तुझे वडील म्हणजेच देशपांडे सर कधीही स्वीकारणार नाहीत. कारण की मी गुंड आहे, असे तो म्हणतो. त्याप्रमाणे सत्तू यालादेखील तो बोलतो की माझी लायकी नाही आहे. देशपांडे सरांच्या मुलीसोबत लग्न करायची आणि तिच्यावर प्रेम करायची. त्यामुळे आता या मालिकेमध्ये येणाऱ्या भागात काय होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

मन उडू उडू झालं या या मालिकेमध्ये दीपूची भूमिका अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने साकारली आहे, तर इंद्राची भूमिका अभिनेता अजिंक्य राऊत याने साकारली आहे. अजिंक्य राऊत हा मूळचा परभणी जिल्ह्याचा रहिवासी आहे. एका ग्रामीण भागातून येऊन त्याने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपले चांगले स्थान निर्माण केले आहे.

या मालिकेनंतर आता या दोघांची जोडी देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे. अजिंक्य राऊत यांनी याआधी विठू माऊली या मालिकेमध्ये काम केले होते. या मालिकेमध्ये त्याची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. मात्र मन उडू उडू झालं मालिकेमध्ये त्याची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडते.

या मालिकेमध्ये हृता दुर्गुळेने देखील अप्रतिम असे काम केले आहे. तिचा लोभस चेहरा प्रेक्षकांना खूपच आवडतो त्यामुळे तिला महाराष्ट्राची क्रश असे म्हटले जाते.हृता दुर्गुळे हिने अनेक मालिका चित्रपटात देखील काम केलेले आहे. हृता दुर्गुळे हिने नुकतीच एक गुड न्यूज आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

ही गुड न्यूज म्हणजे हृताच्या घरी एका पाहुण्याचे आगमन झाले आहे. आपल्याला वाटलं असेल की, हा पाहुणा नेमका आहे तरी कोण? तर घाबरून जाऊ नका. हृता हिच्या घरी एका श्वानाचे आगमन झाले आहे. तिने नुकताच एक कुत्रा खरेदी केला आहे. या कुत्र्यालाचे नाव तिने प्रतीक असे ठेवले आहे.

या कुत्र्या सोबत तिने अनेक आपले फोटो देखील शेअर केले आहेत. तर आपल्याला हृता दुर्गुळे आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

Sayali