नुकतेच लग्न झालेल्या अभिनेत्रीने दिली ‘गुडन्यूज’, लवकरच…

नुकतेच लग्न झालेल्या अभिनेत्रीने दिली ‘गुडन्यूज’, लवकरच…

छोट्या पडद्यावर मन उडू उडू झालं ही मालिका खूप गाजली. ही मालिका अल्पावधीत संपली आहे. मालिका अजून वाढवा, असे म्हणत होते. मात्र, या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या मालिकेमध्ये आपल्याला ऋता दुर्गुळे ही दिसली होती.

ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत यांनी या मालिकेमध्ये अतिशय अप्रतिम असे काम केले होते. या दोघांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. अजिंक्य राऊत याने इंद्राची भूमिका मालिकेत केली होती. तर दिपूच्या भूमिकेमध्ये ऋता दुर्गुळे हे दिसते. ऋता दुर्गुळे हिने या मालिकेदरम्यानच आपला प्रियकर असलेल्या प्रतीक शहा याच्यासोबत लग्न केले.

प्रतीक शहा हा देखील एक अभिनेता व दिग्दर्शक असल्याचे सांगण्यात येते. या दोघांचे गेले अनेक दिवसापासून प्रेम प्रकरण होते. त्यानंतर या दोघांनी लग्न केले. या मालिकेदरम्यानच अजिंक्य राऊत आणि ऋता दुर्गुळे यांच्यातही प्रेम संबंध असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र असे काही झाले नाही. याला बळ तेव्हा मिळाले. जेव्हा अजिंक्य हा या दोघांच्या लग्नाला गेला नव्हता.

मात्र, त्यांनी देखील ही शक्यता फेटाळून लावली होती. या मालिकेनंतर ऋता दुर्गुळे ही आपल्याला टाईमपास थ्री या चित्रपटात दिसली होती. टाइमपास थ्री या चित्रपटातील अतिशय अप्रतिम असे काम केले. या चित्रपटातील त्याची भूमिका देखील प्रेक्षकांना खूपच आवडली होती. त्यानंतर तिच्याकडे आगामी काही काळात आणखीन प्रोजेक्ट असल्याचे देखील बोलले जाते.

एकूणच काय ऋता दुर्गुळे ही आता मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री बनत असल्याचे सध्या तरी आपल्या दिसत आहे. आता ऋता दुर्गुळे यांच्या बाबतीतली एक बातमी समोर आली आहे. ऋता दुर्गुळे ही आता लवकरच आपल्याला एका वेब सिरीज मध्ये दिसणार आहे. अहो सासूबाई अहो सुनबाई असे या वेब सिरीजचे नाव आहे आणि ही वेब सिरीज लवकरच आपल्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे.

या वेब सिरीजमध्ये ऋता दुर्गुळे ही सुनबाईच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. सासु सुने मध्ये होणारे रोजचे भांडण, वादविवाद त्याचप्रमाणे संभाषण आपल्याला दाखवण्यात येणार आहे, असे सांगण्यात येत आहे. तर ऋता दुर्गुळे आपल्याला आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral