पाऊसामुळे थांबलेल्या सामन्यात झालाय रेकॉर्डस् चा मोठा पाऊस, मॅच मध्ये झालेत 7 रेकॉर्डस्, अर्शदीप आणि हार्दिक ने रचलाय इतिहास

पाऊसामुळे थांबलेल्या सामन्यात झालाय रेकॉर्डस् चा मोठा पाऊस, मॅच मध्ये झालेत 7 रेकॉर्डस्, अर्शदीप आणि हार्दिक ने रचलाय इतिहास

T20 विश्वचषक 2022 नंतर, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांची T20 मालिका खेळवली जात होती. मालिकेतील शेवटचा सामना आज 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.30 वाजल्यापासून खेळवला जात होता. भारताला 161 धावांचे लक्ष्य मिळाले होते, मात्र 9 षटकात हार्दिक पांड्याच्या 30 धावांमुळे भारताला 75 धावा करता आल्या आणि मग पाऊस आला.

पावसामुळे थांबलेल्या सामना DLS नियमामुळे सामना बरोबरीत सुटला. भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने ही मालिका 1-0 अशी जिंकली आहे. आजचा सामना पूर्ण झाला नाही पण या सामन्यातही अनेक मोठे विक्रम पाहायला मिळाले- भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात 8 मोठे विक्रम केले

1) न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज डेव्हॉन कॉनवे आज भारताविरुद्ध अडचणीत सापडला होता. आज त्याने 59 धावांची खेळी खेळली. या खेळीच्या जोरावर त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 8 वे अर्धशतक पूर्ण केले.

2) ग्लेन फिलिप्सने आज भारताविरुद्ध 54 धावांची खेळी खेळली. या खेळीमुळे ग्लेन फिलिप्सने 8व्यांदा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 चा टप्पा ओलांडला आहे.

3) आज भारत आणि न्यूझीलंडमधील सामना DLS नियमामुळे बरोबरीत आहे. न्यूझीलंड 160 आणि भारत 75 धावांवर खेळत होते. या सामन्यापूर्वी डीएलएस नियमामुळे 3 सामने टाय झाले आहेत. ज्यात- नेदरलँड विरुद्ध मलेशिया (कीर्तिपूर) – 2021, माल्टा विरुद्ध जिब्राल्टर (MARSA) – 2021, न्यूझीलंड विरुद्ध भारत (नेपियर) – 2022

4) हार्दिक पांड्याने कर्णधार म्हणून दुसरी टी-20 मालिका जिंकली आहे. यापूर्वी हार्दिक पांड्याने त्याच्या नेतृत्वाखाली आयर्लंड दौऱ्यावर टी-20 मालिकाही जिंकली होती.

5) T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन भारतीय गोलंदाजांनी 4-4 विकेट घेतल्या. अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांनी आज 4-4 विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. एकाच सामन्यात दोन गोलंदाजांनी अशी कामगिरी करण्याची भारतीय संघाच्या T20 इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.

6) न्यूझीलंडचा गोलंदाज ईश सोधीने आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये 200 बळी पूर्ण केले आहेत.

7) ग्लेन फिलिप्सने न्यूझीलंडसाठी एका वर्षात सर्वाधिक T20 आंतरराष्ट्रीय धावा केल्या, याआधी हा विक्रम मार्टिन गुप्टिलच्या नावावर होता. आजच्या सामन्यात 17 धावा करत ग्लेन फिलिप्सने मार्टिन गप्टिलला मागे टाकले.

Team Hou De Viral