म्हणून ‘हृता’च्या लग्नाला गेला नाही ‘इंद्रा’, हृताच्या सासूचे खाल्ले इंद्राने बोलणे

म्हणून ‘हृता’च्या लग्नाला गेला नाही ‘इंद्रा’, हृताच्या सासूचे खाल्ले इंद्राने बोलणे

सध्या छोट्या पडद्यावर मन उडू उडू झालं ही मालिका प्रेक्षकांच्या चांगले मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये हृता दुर्गुळे हिचा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. हृता हिने नुकतच प्रतीक शहा याच्याशी लग्न केले आहे. हृता हिची सासू देखील खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

मन उडू झाल या मालिकेत सध्या वेगळ्या घटना घडामोडी घडताना दिसत आहेत. मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे ही दीपू ची भूमिका साकारत असून अभिनेता अजिंक्य राऊत इन्द्रा ही भूमिका साकारत आहे. मालिकेत देशपांडे कुटुंबात शलाका, सानिका आणि दीपिकाच्या तीन मुले आहेत.

लवकरच शलाका ही लग्न करून अमेरिकेला जाणार असल्याने देशपांडे कुटुंबात तिच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, तिच्या सासऱ्याकडून त्यांच्या लग्नासाठी नको ती मागणी केली जात आहे. ही मागणी पूर्ण करताना देशपांडे कुटुंबाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मालिकेत शलाका हे पात्र घाबरट आणि लगेच वाईट वाटून घेणारे दर्शवले आहे.

ही भूमिका शर्वरी कुलकर्णी साकारत आहे. अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी कुलकर्णी या मालिके अगोदर सोनी मराठी वाहिनीवरील “आनंदी हे जग सारे” या मालिकेतुन छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यात तिने मीराची भूमिका साकारली होती. शर्वरी कुलकर्णी ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री संपदा कुलकर्णी यांची मुलगी आहे.

तर आज आम्ही आपल्याला ‘मन उडू उडू झालं’ मालिकेत काम करणारी हृता हिचा होणारा पती प्रतीक शहा याची आई आणि हृता हिच्या होणाऱ्या सासू यांच्या बद्दल माहिती देणार आहोत. हृता हिच्या सासुचे नाव मुग्धा शहा असे आहे. मुग्धा शहा यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. त्या प्रसिद्ध अशा अभिनेत्री आहेत.

मुग्धा यांनी आधी बे दुणे साडेचार, मिस्मॅच, कर्तव्य, माहेर माझं पंढरपूर, पूछो मेरे दील से, संभव असंभव यासारख्या अनेक मालिका आणि चित्रपटात देखील काम केले आहे. आता या मालिकेमध्ये इंद्रा ही भूमिका साकारणारा अजिंक्य राऊत याने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आपण हृ ता हिच्या लग्नाला गेलो नाही याचे कारण सांगितले आहे.

कारण याच दिवशी माझ्या आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे मी परभणी येथे आपल्या मूळ गावी गेलो होतो, असे त्याने सांगितले आहे. एक दिवस माझ्या बहिणीचा फोन आला आणि तिने मला सांगितले की. तू हृ ताच्या साखरपुड्याला गेला होता. त्यामुळे आता लग्नाला गेले, नाही तरी चालेल आणि तू आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाला परभणीला जा.

त्यामुळे मी तिकडे गेलो होतो असे त्यांनी सांगितले. छोट्या शहरांमधून जे कलाकार मोठ्या शहरात करिअर करण्यासाठी येतात, त्यांच्यासाठी कुटूंबाचे बाऊंडींग हे खूप जास्त असते, असेही त्याने सांगितले. त्यामुळे हृ ता हिची सासू मुग्धा शहा यांनी देखील मला आता तू यापुढे तोंड दाखवू नको, असे गमतीने म्हटले असल्याचे अजिंक्य राऊत याने सांगितले आहे.

त्यामुळे आता मी तिच्या घरी कसे जाणार हा देखील एक प्रश्न आहे, असे तो म्हणाला.

Team Hou De Viral