‘मन उडू उडू झालं’ मालिकेतून इंद्रा पडणार बाहेर, त्याजागी दिसणार हा अभिनेता

‘मन उडू उडू झालं’ मालिकेतून इंद्रा पडणार बाहेर, त्याजागी दिसणार हा अभिनेता

मन उडू उडू झालं” ही मालिकाही प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री ऋता दुर्गुळे दिसलेली आहे. या मालिकेमध्ये अजिंक्य राऊत हा अभिनेता दिसला आहे. या मालिकेमध्ये दिपू आणि इंद्रा ही जोडी दाखवण्यात आलेली आहे.

ही जोडी देखील प्रेक्षकांचे चांगलच मनोरंजन करत आहे. मात्र, या मालिकेवर गेल्या काही दिवसापासून टीका देखील होताना दिसत आहे. मालिकेचं कथानक पाहून प्रेक्षकांनी यावर टीका केली. एक शिक्षक व्यक्ती असूनही मुलीच्या लग्नासाठी हुंडा देतो, असे म्हणून अनेकांनी यावर टीका केलेली होती.

आता या मालिकेमध्ये काम करणारी ऋता दुर्गुळे लवकरच एका चित्रपटात दिसणार, असे सांगण्यात येते. अभिनेता वैभव तत्ववादी याने हृता सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने कॅप्शन देखील दिले आहे. त्यामध्ये त्याने सांगितले आहे की, ऋता तुझ्या सोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता.

लवकरच हा अनुभव आणखीन मोठा होणार असल्याचे त्याने म्हटले आहे. वैभव तत्ववादी याने याआधी अनेक मालिका व चित्रपटातही काम केलेले आहे. त्यामुळे ऋता आणि वैभव हे पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आता ऋता दुर्गुळे ही टाईमपास थ्री या चित्रपटातही दिसणार आहे.

या चित्रपटातील पालवी पाटील ही भूमिका साकारणार आहे. पालवी पाटील ही आक्रमक भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा विश्वास देखील व्यक्त करण्यात येत आहे. या टाईमपास थ्रीचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता.

मन उडू उडू झालं ही मालिका आता प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये आता वेगळा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. हा ट्विस्ट म्हणजे आता मालिकेमध्ये इंद्रा हा काही दिवसांसाठी गायब होणार आहे. याचे कारण म्हणजे आता इंद्राचा मित्र असलेला सत्तू हा इंद्राचे बालपण हे देशपांडे कुटुंब समोर मांडणार आहे.

इंद्रा याचे लहानपण अतिशय खडतर गेलेले आहे. त्याने लहानपणी खूप काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाला सावरले आहे, असे तो सांगतो. त्याचे मग बालपण सुरू होते आणि या बालपणासाठी एका छोट्या बाल कलाकाराची निवड करण्यात आली होती. त्यामुळे आता इंद्रा हा आपल्याला काही दिवस मालिकेत दिसणार नाही.

तर या बाल कलाकाराबाबत अधिक माहिती मिळाली नाही. मात्र, काही दिवसानंतर पुन्हा इंद्रा मालिकेत दिसेल, असे सांगण्यात येते.

Team Hou De Viral