IPL मध्ये छाप सोडणारी दीपक चाहर ची मॉडेल बहीण, भावाच्या हॅट्रिक वर बोलली अस काही..

IPL मध्ये छाप सोडणारी दीपक चाहर ची मॉडेल बहीण, भावाच्या हॅट्रिक वर बोलली अस काही..

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसर्‍या टी – 20 सामन्यात दीपक चहरने शानदार हॅट्रिक घेतली, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. याच दरम्यान, आयपीएलच्या मिस्ट्री गर्लनेही तिच्या सोशल मीडियावरुन त्याचे अभिनंदन व आणि कौतुक केले आहे.आता तुम्ही विचार कराल की आयपीएलची ही मिस्ट्री गर्ल कोण आहे? आम्ही सांगतो, 2018 च्या आयपीएलच्या हंगामात, ती चेन्नई सुपर किंग्जच्या प्रत्येक सामन्यात दिसली, कॅमेरामॅनने तिच्याकडे कॅमेरा वळवला आणि सोशल मीडियावर ती मिस्ट्री गर्ल म्हणून प्रसिद्ध झाली. नंतर समजले की ती चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत असणाऱ्या दीपक चहरची मोठी बहीण असून, जिचे नाव ‘मालती चहर’ आहे.

इन्स्टाग्रामवर विडिओ पोस्ट करून केली प्रशंसा

दीपकने हॅट्रिक घेतल्यानंतर मालती चहरने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “मला तुझा अभिमान आहे. आपण टी – 20 मध्ये उत्कृष्ट हॅट्रिक घेऊन उत्कृष्ट गोलंदाज असल्याचे सिद्ध केले. माझ्या अंगावरतर काटे उभे राहिले आहेत. लव्ह यू भाई” मालती चहरने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दीपक हॅट्रिक घेतल्यानंतर सेलिब्रेट करताना दिसत आहे.

टी – 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दीपक चहरने 7 रन देत 6 विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम केला. हा क्रिकेट इतिहासातील पहिला प्रसंग आहे, कोणत्याही गोलंदाजीच्या डावात किंवा सामन्यातल्या गोलंदाजीच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या यादीत भारतीय गोलंदाज अव्वल स्थानावर आहे.

दीपकने विश्वविक्रम केला

नागपूर येथे बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी – 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात चहरने 3.2 षटकांत 7 धावा देऊन सहा विकेट्स घेतल्या, जे या स्वरूपात नवीन विश्वविक्रम आहे. त्याने 2012 मध्ये श्रीलंकेच्या अजिंठा मेंडिसच्या आठ धावा देत सहा विकेट्सचा विक्रम मोडीत काढला.

अशाप्रकारे त्याने क्रिकेटच्या या सर्वात छोट्या स्वरूपातील सामन्यातील गोलंदाजीतील सर्वोत्कृष्ट कामगिरीचा विक्रम गाठला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही अशी कामगिरी आहे जी यापूर्वी कोणत्याही भारतीयांने केली नव्हती. कसोटी क्रिकेटमध्ये अनिल कुंबळेने एका डावात सर्व दहा बळी मिळविण्यास यश मिळवले पण तरीही तो एका डावात सर्वोत्तम गोलंदाजीच्या कामगिरीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचू शकला नाही.

1999 मध्ये नवी दिल्ली येथे पाकिस्तानविरुद्धच्या दुसर्‍या डावात कंबळेने 74 धावा देऊन सर्व दहा बळी मिळवले होते, परंतु तरीही 1956 मध्ये जिम लेकरने केलेला 53 धावा देऊन 6 विकेट्सचा विक्रम तो मोडू शकला नाही.

Team Hou De Viral