जेव्हा मुलगी ईशाची ‘ती’ क्लिप बघितल्यानंतर हेमा मालिनी यांना रडू आले होते, जाणून घ्या नेमकं काय होत त्या क्लिपमध्ये

तुमच्या माहितीसाठी की हेमा तिची मुलगी ईशा सोबत खूप जवळ आहे.कारण हेमाने पण तिला लहानपणा पासून प्रत्येक कामात खूप सपोर्ट केला आहे.ईशा अत्ता सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने हेमा मालिनी व सिंगिंग शो इंडियन आयडॉल मध्ये स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी गेली होते.
शो मध्ये जेव्हा ईशाचा व्हिडिओ प्ले केला तेव्हा ईशा बोलली आपणा सर्वांसाठी हेमाजी ड्रीम गर्ल आहे पण आमच्या सर्वांसाठी ड्रीम गर्ल त्याच बरोबर आमची अम्मा देखील आहे. ती पुढे बोलली आई मला तुझ्यावर खूप गर्व आहे की तू माझी आई आहेस.
मी स्वतःला खूप नशीबवान समजते की देवाने मला तुझी मुलगी बनवलं.तिने सांगितले की तिच्या लहानपणी च्या तिच्या आईसोबतच्या आठवणी ती कधीच विसरु शकत नाही.ईशाचे हे सगळं बोलणं ऐकून हेमाजी त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबवू शकल्या नाही.
हेमाजी बोलल्या की ईशा खूप गोड मुलगी आहे.आणि फक्त ईशाच नाही अहाना पण खूप गोड आहे.मी देवाचे आणि धर्मेंद्रजी चे आभार मानते की त्यांच्यामुळे मला अश्या गोड मुली मिळाल्या.हे बोलताना हेमाजी एवढ्या भावनिक झाल्या की त्या पुढे काही बोलूच शकत नव्हत्या. फक्त त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या.
हेमाजीने त्यांच्या शूटिंग चे किस्सा सांगताना धर्मेंद्र बाबत अशी एक गोष्ट सांगितली जी ऐकून आपण सर्व थक्क झाल्याशिवाय नाही राहणार.जेव्हा इंडियन आयडॉल स्पर्धक अंजली गायकवाड ने ए दिले नादान आणि और झुठे नैना बोले या सारखे गाणे गायले तेव्हा तिचे हे खूप गोड आवाजातले गाणे ऐकून जज ने पण तीच खूप कौतुक केले.
जज सोबत हेमाजीने पण कौतुक केले व याचवेळेस काही किस्से शेअर केले. दानिश खान ने आजा तेरी याद आई गाणं म्हंटले होते.1976 च्या चरस या चित्रपटातील धर्मेंद्र आणि हेमाजी यांचेच होत.याची शूटिंग भारताबाहेर झाली होती. त्या दिवसाला आठवून हेमाजी बोलल्या की जेव्हा मी आणि धर्मेंद्रजी एकमेकाला डेट करत होतो आणि या गाण्याची शूटिंग होत होती तेव्हा हेमाजीचे वडील सेट वर येत असत कारण माझी आणि धर्मेंद्रजी ची भेट होऊ नये.
हेमाजी बोलल्या की जास्त तर शुटींगच्या वेळीस माझी आई किंवा माझी काकू माझ्यासोबत येत असायची पण या गाण्याच्या शुटींग च्या वेळी माझे वडील सेट वर यायला लागले की त्यांना काळजी होती की मी आणि धर्मेंद्र जवळ नको यायला त्यांना माहिती होते की आम्ही खूप जवळ दोस्त बनलो होतो.
हेमाजी बोलल्या की मला चांगलं आठवत आम्ही जेव्हा कार मधून जात होतो तेव्हा माझे वडील लगेच माझ्या जवळ येऊन बसत असत.पण धर्मजी पण काही कमी नव्हते ते पण दुसऱ्या बाजूने माझ्या बाजूला येऊन बसत असत व म्हणायचे मला तुमच्यासोबत यायचे आहे.