… म्हणून जॅकलिनने सलमान खानचा फार्म हाऊस सोडला, समोर आले हैराण करणारे कारण

… म्हणून जॅकलिनने सलमान खानचा फार्म हाऊस सोडला, समोर आले हैराण करणारे कारण

बॉलिवूड मधली एक सुंदर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर कायमच अ‍ॅक्टिव्ह असते आणि तिच्याबाबतच्या बातम्या आपण वाचत असतोच. ती तिच्या सोशल हँडलवरून तिच्या चाहत्यांसाठी काही न काही पोस्ट शेअर करत राहते. मात्र, यादिवसांत जॅकलिन बॉलिवूड अभिनेता सलमान खानबाबत चर्चेत आहे.

जॅकलिन सलमान खानच्या पनवेल फार्म हाऊसमध्ये होती जेव्हा देशात लॉकडाउन जाहीर झाला होता, पण आता जॅकलिन फर्नांडिसने सलमान खानचे फार्म हाऊस सोडल्याची बातमी समोर येत आहे. बातमीनुसार, अभिनेत्रीने तिच्या मैत्रिणीच्या मदतीसाठी सुपरस्टारच्या फार्महाऊसमधून शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे.

पिंकविलाच्या अहवालानुसार जॅकलिन लॉकडाऊन दरम्यान मुंबईत एकटीच राहत होती आणि तिच्या जवळच्या मैत्रिणीशी ती बोलत असे. त्या दोघेही अगदी जवळच्या मैत्रीणि आहेत. संभाषणादरम्यान अभिनेत्रीला समजले की तिची मैत्रीण ही खूप दिवसांपासून तणावाखाली आहे. त्यामुळे जॅकलिनने सलमान खानचे फार्म हाऊस वेळ न गमावता रात्रीतून सोडले व तिच्या मैत्रिणी बरोबर राहायला गेली.

जॅकलिन तिची तब्येत बरी होईपर्यंत तिच्या मैत्रिणीबरोबर राहणार आहे. जॅकलीनला नेहमीच तिच्या बरोबर वेळ घालवयाला आवडते. आपल्या सर्वांना माहितीच आहे की महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढविला आहे. अशा परिस्थितीत जॅकलिन फर्नांडिसने तिच्या मैत्रिणीला एकाकीपणा व तणावातून वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

चित्रपटांबद्दल बोलताना, जॅकलिन फर्नांडिजला शेवटच्या नेटफ्लिक्स चित्रपटात मिसेस सीरियल किलरमध्ये पाहिले गेले होते. या चित्रपटात मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत आहेत. तसेच अजून जॅकलिन आणि सलमान खान यांचे एक रोमँटिक भावनिक गाणही नुकतेच रिलीज झाले होते, जे चाहत्यांना खूप आवडले होते.

इतर बातम्या –

महेंद्र सिंह धोनी ने पत्नी साक्षीवर केले असले आरोप, म्हणाला – तिच्या फायद्यासाठी ती..

एकेकाळी सलमानच्या पाठीमाघे गर्दीत डान्स करायची ही अभिनेत्री, आज बनली आहे प्रसिद्ध ‘हॉट’ अभिनेत्री

Team Hou De Viral