विराट नंतर हा प्रसिद्ध ‘मराठमोळा’ क्रिकेटपटू होणार ‘बाबा’

विराट नंतर हा प्रसिद्ध ‘मराठमोळा’ क्रिकेटपटू होणार ‘बाबा’

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांनी आपल्या चाहत्यांना मागेच गोड बातमी दिली आहे व ते लवकरच आई-बाबा होणार असल्याचे सांगितले होते. आता भारताचा आणखी एक दिगग्ज माजी गोलंदाज बाबा होणार असल्याची चर्चा आहे.

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान लवकरच बाबा होणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार अशी बातमी आहे की त्याची पत्नी अभिनेत्री सागरिका घाटगे गर्भवती आहे. आयपीएलमुळे हे दोघही दुबई मध्येच मुंबई इंडियन्सच्या संघासोबत आहेत. तस पाहिलं तर झहीर आणि सागरिका यांनी आत्ता तरी ही चांगली बातमी चाहत्यांशी शेअर केलेली नाही.

मुंबई मिररच्या वृत्तानुसार सागरिका गर्भवती आहे. वृत्तानुसार झहीर आणि सागरिकाच्या मित्रांनीही याची पुष्टी केली आहे की दोघेही आई-बाबा होणार आहेत. अलीकडेच मुंबई इंडियन्सच्या संघाने झहीर खानचा वाढदिवस साजरा केला आणि यावेळी सागरिका घाटगे ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत होती. दोघेही पहिल्यांदा आई-बाबा होणार आहेत.

जहीर खान आणि सागरिका यांचा विवाह 2017 ला झाला होता. हिंदू आणि मुस्लीम दोन्ही पद्धतीने हा विवाह पार पडला. जहीर हा भारताचा यशस्वी माजी गोलंदाजी असून सागरिका अभिनेत्री आहे. सागरिकानं चक दे इंडिया सारख्या ब्लॉकब्लास्टर सिनेमांमध्ये काम केले आहे.

सागरिकानं मराठी सिनेमांमध्येही काम केले आहे.दोघेही सध्या युएईमध्ये आहेत. झहीर आयपीएलच्या फ्रेंचायझी मुंबई इंडियन्सचा कोच म्हणून संघात आहे. जानेवारीत अनुष्का तिच्या पहिल्या मुलास जन्म देईल आणि तीही सध्या विराटसमवेत युएईमध्ये आहे.

झहीरच्या वाढदिवसा दिवशी भावनिक पोस्ट शेअर करताना सागरिकाने लिहिले की, ‘माझा जिवलग मित्र, माझ्यावर अतिशय निस्वार्थ प्रेम करणारा व्यक्ती तुझ्या शिवाय मी काहीच नाही हॅपी बर्थडे डिअर.

इतर बातम्यांसाठी आत्ताच आमचे पेज लाईक करा.

Team Hou De Viral