रोज एक चमचा जवस खा, आणि ‘या’ मोठ्या मोठ्या आजारांना एका झटक्यात पळवून लावा

पुर्वीच्या काळात जवसाचा वापर रोजच्या जेवणात होत असे. मात्र काही दिवसात जवसाचा रोजच्या आहारात वापर कमी झालाय. पुर्वी जवसाची चटनी, जवसाची पूड वगैरे भाजीत टाकायचे. जवसचा वापर रोजच्या आहारात करणे फार महत्त्वाचे आहे. जवसचे तेल स्वयंपाकघरात अवश्य केला पाहिजे. जवसाचं तेल लहान बाळासाठीही खूप गुणकारी आहे. जवसाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
1. दाह कमी करते – लघवी करतांना होणारी दाह कमी करण्यासाठी जवस फायद्याची ठरते. यासाठी जवसचा काढा बनवावा. 12 ग्रॅम जवस आणि 6 ग्रॅम ज्येष्ठमध घेऊन त्याची पूड करुन घ्यावी. त्यानंतर 1 लीटर पाण्यात ते उकळून घ्यावे. हा काढा तयार झाल्यानंतर त्यात 12 ग्रॅम खडीसाखर टाकावी आणि रोज 2 चमचे सकाळ आणि संध्याकाळ घ्यावे. लघवीच्या जागी होणारी जळजळ कमी होते.
2. हिरड्या आणि दात मजबूत करते – हिरड्या मजबूत होण्यासाठी आणि दात दुखत असेल तर जवसचं तेल फायदेशीर ठरते. जवसच्या तेलाने मसाज करावा.
3. कफ बाहेर काढणे – जवसाचं पीठ घेऊन त्याने छाती शेकली तर कफ पातळ होऊन तो बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे ताप देखील लगेच जातो.
4. पाठदुखी – पाठ दुखत असेल तर दुखणाऱ्या जागी जवस बांधून ठेवावे. असे केल्याने पाठदुखी पासून लवकर आराम मिळतो
5. भाजलेल्या जागी बांधावे – एखाद्या ठिकाणी भाजलं असेल तर त्या ठिकाणी जवसचं तेल आणि चुन्याची निवळी एकत्र करुन बांधावी. यामुळे जखम लवकर बरी होते.
6. पचन क्रिया सुधरते – आहारात जवसाचा वापर केल्यास भूक वाढते आणि पचनक्रिया देखील चांगली राहते. आणि जर आपली पचनक्रिया जर चांगली असेल तर आपल्याला पोटसंबंधीत कोणतेही आजर उद्भवत नाही.
7. इतर फायदे – रोज सकाळी अनशेपोटी एक चमचा जवसाचे तेल प्यायल्याने बीपी, डायबेटीस, हृदयाचे आरोग्य चांगले राहते. हिवाळ्यात जवस खाल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. हृदयावरील पाण्याचा दाब कमी करण्यासाठी देखील जवस मदत करते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.