BBM3 : जय दुधानेचा ‘या’ महिला स्पर्धकाशी ‘फ्लर्ट’ करतांनाचा विडिओ झाला व्हायरल, पहा विडिओ

BBM3 : जय दुधानेचा ‘या’ महिला स्पर्धकाशी ‘फ्लर्ट’ करतांनाचा विडिओ झाला व्हायरल, पहा विडिओ

बिग बॉसच्या घरामध्ये आता रोमँटिक वातावरण होताना दिसत आहे. जय दुधाने आता रोमान्स करतानाच्या मूडमध्ये आलेला आहे. याबद्दलच आम्ही आपल्याला या लेखामध्ये माहिती देणार आहोत. हिंदी बिग बॉस यावरूनच मराठी बिग बॉसची प्रेरणा देण्यात आलेली आहे. हिंदी बिग बॉस मध्ये काही वर्षांपूर्वी आपण अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी यांचे प्रेम प्रकरण पाहिले असेल.

त्यानंतर हे प्रेम प्रकरण घराच्या बाहेर देखील गेले होते. मात्र, अजय देवगन याला आपल्या मेहुणीचे प्रेम प्रकरण अजिबात आवडले नव्हते. त्यामुळे तनिषा मुखर्जीला अजय देवगन यांनी समजावून सांगितले. त्यानंतर या दोघांमध्ये ब्रेकअप झाले. बिग बॉसच्या घरामध्ये अशा अनेक कहाण्या या पाहायला मिळतात.

मराठी बिग बॉसच्या पहिल्या भागामध्ये आपण अभिनेत्री रेशम टिपणीस तिला पाहिले असेल. रेशम टिपणीस हिने देखील आपल्या स्पर्धक कलाकारासोबत रोमान्स केला होता. त्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये प्रचंड वादंग निर्माण झाले होते. बिग बॉसच्या घराच्या बाहेर पडल्यानंतर तिने आपल्या पतीपासून घटस्फोट देखील घेतला होता.

आता असाच काहीसा प्रकार बिग बॉसच्या या घरांमध्ये देखील होताना दिसत आहे. महेश मांजरेकर या सगळ्या प्रकारावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे ती चावडीवर सर्व कलाकारांना त्यांच्या काय चुका झाल्या आहेत. हे सांगत असतात. बिग बॉसच्या घरांमधून अभिनेता व स्पर्धक अक्षय वाघमारे हा घराबाहेर पडला आहे.

त्यामुळे त्याला निरोप देताना अनेकांच्या भावना उचंबळून आल्या होत्या. भ्रमाचा भोपळा फोडण्याचा प्रकार हा टास्क हा प्रकार देखील प्रेक्षकांना आता खूपच आवडत आहेत. जय दुधाने हा व्यवसायाने मॉडेल आणि उद्योजक आहे, त्याची बॉडी ही अतिशय पाहण्यासारखी आहे. त्यामुळे तो बिग बॉसच्या घरामध्ये उघडा फिरत आहे.

त्याच्या अशा वागण्यावर देखिल अनेकांनी टीका केल्याचे पाहायला मिळते. कारण की, बिग बॉसच्या घरामध्ये अनेक महिला आहेत. त्यांना वेगळ्या भावना उत्पन्न होऊ शकतात, असे देखील अनेक कलाकारांनी म्हटले आहे. बिग बॉसमध्ये स्नेहा वाघ ही देखील सहभागी झाली आहे. तसेच तिच्या सोबत या बिग बॉसमध्ये तिचा घटस्फोटित पत्ती अविष्कार दारव्हेकर देखील सहभागी झाला आहे.

स्नेहा हिने अविष्कारनंतर अनुराग साळवी या फॅशन डिझाईन सोबत लग्न केले होते. मात्र, तिने त्याच्या सोबतही घटस्फोट घेतला होता. त्यानंतर फैजल खान या अभिनेत्यासोबत देखील तिने रोमान्स केल्याचे सांगण्यात येते. आता बिग बॉसच्या घरामध्ये जय आणि स्नेहा वाघ यांच्या मध्ये काहीतरी शिजत असल्याचे दिसत आहेत.

कारण रात्री झोपताना जय दुधाने हा स्नेहा वाघकडे एक कटाक्ष टाकून फ्लर्टींग करताना दिसत आहे. तसे तिला बोलत आहे, की गुड नाईट आता झोप लवकर. स्नेहा काहीतरी बारीक आवाजात बोलते. त्यानंतर तो म्हणतो, गुड नाईट. स्वीट ड्रीम. आता झोप. मी चाललोय झोपायला. त्यामुळे या दोघांमध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये रोमान्स आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Team Hou De Viral